वाळू झाकली, मातीची तस्करी सुरु झाली
देवणी (लातूर प्रभात प्र.) ः गेल्या तीन चार वर्षापासून मांजरा नदी पात्रातून अवैद्य वाळू उपसा होत होता. तेथील नागरीकांनी शासन दरबारी तक्रारी करुन ही न्याय मिळाला नाही. पत्रकाराने ही त्या संदर्भात न्यायीक भुमिका घेतली. पंरतू जिल्हा प्रशासन उपविभागीय अधिकारी निलंगा, आणि तहसीलदार देवणी यांनी याकडे दुर्लक्ष करुन वाळू माफिया व मध्यस्ती एंजटाना अभय दिला. त्यातच आजघडीला मांजरा नदी पात्रा काठावरील शेतीवरील मातीची तस्करी अवैद्यरित्या होत असल्याने त्याभागातील नागरीक हवालदिल झाल्याचे बोलले जाते आहे.
पाटबंधारे विभागा मार्फत देवणी तालुक्यातील गिरकचाळ येथे प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात गेलेल्या जमिनी शासनाने हस्तातंरीत केल्या. तरी ही तेथील दलाला मार्फत ज्याकांही तिनचार कपंण्या कार्यरत आहेत, त्यांच्या मार्फत शासकीय जमिनीवरील माती तेथील शेतकर्याकडून तीनशे ते चारशे रुपये हायवा घेत आहेत. त्या जमिनीवर शेतकर्यांचा कांही अधिकार नाही. विकत घेतलेली माती जवळच्या खाजगी शेतकर्यांना दोन हजार रुपयात विकली जाते. ही माती दररोज तिन चारशे हायवा वाहनातून माती वाहून नेली जाते. याकडे शासकीय अधिकारी असलेले निलंग्याचे उपविभागीय अधिकारी, देवणीचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस, डोळेझाकून कसे काय बसले असावेत, यातील गौडबंगाल काय आहे, अशी चर्चा होताना दिसते आहे.
अवैद्य माती वाहतूक करणारे १०० हायवा वाहने, १०० चालक, अनेक मजूर, शेतकर्यासह चार ते पाचशे लोकांचा लवाजमा असतो. आजघडीला कोरोना विषारी रोगामुळे संचार बंदी लागू असताना हे लोक खुलेआम कसे फिरतात, काम करतात याकडे पोलीस, महसूल अधिकारी, तहसीलदार यांचे दुर्लक्ष केसे आणि अवैद्य माती वाहतूक होते की, यातून चिरिमिरीचा वास येत असल्याची चर्चा त्या परिसरात होताना दिसते आहे. ज्या कंपणीची ही वाहने आहेत, त्या वाहनातून माती, वाळू वाहतूक केली जाते, या मध्ये स्थानीक मुख्य सुत्रधार कोण असावा, अशी ही चर्चा होत असली तरी वाळू उपसा असो की, माती उपसा असो यातून शासनाचा महसूल बुडतो आहे, याचे भान तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना कसे काय नसावे, त्यांचे पांढरे हात काळे झाले असावेत की काय असे ही दबक्या आवाजात महसूल विभागात होताना दिसते आहे.