कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वैद्यकीय मंत्री अमित देशमूख सरसावले

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वैद्यकीय मंत्री अमित देशमूख सरसावले


      मुंबई (लातूर प्रभात प्र.) ः कोरोनाग्रस्त रुग्णाची तपासणी करणे, निदान करणे, कठीण जात होते.  पंरतू वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीश तज्ञाची बैठक घेवून अधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चाचणी, तपासणी, उपचार यासाठीची यंत्रणा उपलब्ध करुन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमूख यांनी पुढाकार घेवून कोरोनाग्रस्त रुग्णासाठीच्या उपचारासाठी सरसावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होताना दिसते आहे. 
     परदेशातून येणारे सर्व नागरीक मुंबईतच येत असतात.  त्यांची तात्काळ तपासणी, चौकशी केली जाते.  व त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात येते.  रुग्णाची संख्यावाढच असल्याने प्रारंभी भायखळा येथील जे जे रुग्णालयात आत्यधुनिक सुविधा यंत्रणा रुग्ण तपासणी कक्ष, रुग्णांच्या खाटा, कोरोना रुग्णाचे विलगीकरण या बाबीची प्रत्यक्ष भेटीत पाहणी करुन संबधीतांना वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमूख यांनी सुचना दिल्याने कोरोना रुग्णाना तात्काळ उपचार मिळतील अशी आशा बळावल्याचे दिसते आहे. 
     दरम्यान मुंबई, पुणे येथील कोरोना तपासणी केंद्राना मान्यता दिल्यानंतर नागपूर, अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज, आणि लातूर येथील विलासराव देशमूख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ही आधुनिक तपासणी व उपचार केंद्र सुरु करणार असल्याचे स्पष्टीकरण ही मंत्री अमित देशमूख यांनी केले. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या