संपादकीय...

संपादकीय...


जगणार्‍यानो कोरोना प्रवास कठीण


जगण्याने मला छळले...
सरणावर गेल्यानंतर
मृत्यूने मला सोडविले....
      असे एका कविणे जगण्यातला अर्थ विशद केला आहे.  तो आजघडीला सार्थवाटतो आहे.  जगण्यातले कठोर प्रवास हे कठीणच असतो.  टिचभर पोटासाठी धडपड, घोटभर पाण्यासाठी वनवन, अशी रोजची कटकट, यातले गांभिर्य झोपडीतील लोकांनाच कळते.  तरी ही ती धग, धाकधूक, धावपळीला तोंड देवून ते जगतातच.  कारण जगण्यातला अर्थ असतो.  याच मानसानी रोजच्या संकटाना तोंड देत देत दुष्काळ पाहिला, स्कायलॉबची अफवा सोसली, भुकंप पाहिला, अतिवृष्टी सोसली.         दंगली पाहिल्या, स्वतःचे घर जळतानाही ते पाहत पाहत दुसर्‍यांच्या घरांची आग विझवायला गेले. पण आज अशा या माणसानी स्वतःच्या झोपडीत जिव मुठित घेवून स्वतःलाच कोंडवून राहवे लागते आहे.  
 निमित्त आहे, कोरोना या ससर्ंगजन्य रोगाचा मुकाबला करुन उद्याचे दिवस पाहण्यासाठी जगायचे म्हणूनच ही जनतेची संचार बंदी जिवावर बेतली की काय अशी भिती त्या पामराना भेडसावीत असावी अशीच सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.  घाबरु नका पण काळजी घ्या, हा शासकीय संदेश आहे.  त्यावर कोणी संचार बंदीचे उलंघन केले तर कारावास आणि दंड अशी धमकी ही आहे, पण कोंडून राहाणार्‍या गरीबाना कोंडवून राहाणार्‍याना जगण्यासाठीची गरजू वस्तू पुरविण्याचे प्रमाण शासन देत नाही, पंरतू जनता संचार बंदीचे पालन करा असे सांगूण शासकीय कार्य उरकून घेताना दिसत असल्याची चर्चा होताना दिसते आहे. 
      देशातील जानकार आसे शरद पवार यांनी जनतेला संयम पाळा, शांतता राखा, परिस्थितीत समजून घ्या, कोरोनाची प्रतिकात्मक लढाई निश्‍चितच यशस्वी होइल, असे स्पष्ट केले.  तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कठोर जमाव बंदी जाहिर करुन संसर्ग कोरोना रोगाला बळकटी देवून जनतेलाच भयभित केले.  तर प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना हा विषारी रोग परतविण्याची ताकद जनतेत आहे, वैद्यकीय तज्ञ कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असे सांगून जनतेने कुलूप बंद राहवे अशी ताकीद दिली.  पंरतू अशा या जेष्ठानी भुकेल्यासाठी कांही उपाययोजना करण्या बाबतीत कांहीच बोलले नाहीत.  कारण त्यांना भुक काय असते, याचीच जाणीवच नसते.  यात त्यांचा दोष नसला तरी कोरोना रोगाला तोंड देणार हीच धुपती लोकभवाना व्यक्त होताना दिसते आहे. 
      कोरोना रोगावर उपायासाठी ५० औषधाची चाचणी करण्यात येते आहे.  अशी एक बातमी न्युयार्क मधून पसरविली गेली आहे.  पंरतू भारतातील वैद्यकिय शास्त्रज्ञ, उच्च पदस्थ वैद्यकीय अधिकारी, संशोधक काय करीत आहेत, अशी शंकात्मक चर्चा होत असून केवळ संशयीताना तपासणे, कोणाला सोडणे, तर कोणाला रुग्णालयात भरती करुन त्यावर उपाय करणे, हे सुपस्कार कार्य करणे हेच काम आहे का, अशी शंका व्यक्त होताना दिसते आहे.  मलेरिया, अमोनिया, नंतरची कोरोना आजाराची प्ररिस्थिती असावी अशी चर्चा वैद्यकीय अधिकार्‍यात होताना दिसते आहे.  श्‍वासापासून ते हाताच्या बोटापासून कोरोना रोगाची उत्पती होते, त्यासाठी सातत्याने हात धुवून घ्या, अशी सरकारी जाहिरात, दुरचित्रवाणीवरुन झळकते आहे.  तर अमिताभ बच्चन मास्क व रुमालाचा वापर करा म्हणून सांगत आहेत.  एवढ्याने कोरोना रोगाचा प्रतिकार होणार आहे का, अशी चर्चा होत असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जशी कठोर संचारबंदी जाहिर केली, तशी मोदी-ठाकरे यांनी कठोर वैद्यकीय उपाययोजना राबवाव्यात अशी ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 
      जनता घरात कोंडवून घेवून बसलीय, पोलीस रस्त्यावर उभे आहेत, धावाधाव करीत आहेत, म्हणून त्यांचे आभार माणून चालणार नाही, तर त्यांच्या सुविधेकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे.  अशी ही चर्चा होताना दिसते आहे.  कोरोनाग्रस्त रुग्णावर जे कांही उपचार होत आहेत, ते रोग रेड्याला, आणि इंजेक्शन पकालीला, अशीच अवस्था वैद्यकीय क्षेत्रातील अधिकार्‍यांची झाली असावी कारण त्यांना या रोगाचे निदान झाले नसावे अशीही चर्चा होताना दिसते आहे. यास शासकीय वैद्यकीय क्षेत्रच जबाबदार असावे अशी चर्चा वैद्यकीय वर्तूळात होताना दिसते आहे.  एकंदरित कोरोना रोगाच्या प्रतिकारासाठी जनता लढण्यास तयार असली तरी जशी कोठोर संचार बंदी जाहिर केली त्याच धरतीवर संशयीत कोरोना रुग्णावर आणि कोरोना प्रतिबंधासाठी शासकीय वैद्यकीय तज्ञानी पाउले उचलावीत आणि जनतेस कोरोनावासात ठेवू नये अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या