मागील वादाची कुरापत काढत जातीवाचक शिवीगाळ करून भर रस्त्यावर धारधार शास्त्राने जीवघेणा हल्ला !

     
      बीड(प्रतिनिधी)धारूर येथील शिवाजी महाराज चौक येथील आई मेडिकलचे समोर केज रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन फिर्यादी रविंद्र उत्तम सिरसट,वय 45 वर्षे,रा.धारूर यास दहा ते बारा जणांनी लाठ्या-काठ्या व धारधार शस्त्राने जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.सदरची घटना दि.23/08/2024 रोजी घडली.
    याबाबत माहिती अशी की,सर्व आरोपींना फिर्यादीची "महार"ही जात माहीत असुनही त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत ह्या महारड्याचि आता जिरवायचि,लई माजलाय हा, असे म्हणत लाठ्या-काठ्या व धारधार शस्त्राने जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.दि.23/08/2024 रोजी फिर्यादी हा त्यांचे शेत नामे हाडुळा तंदळवाडीरोड येथे असताना कल्पना अनंत जाधव हीचा सायंकाळी 6 वा.चे सुमारास फोन आला व म्हणाली की, आई मेडीकल केज रोड येथे तीला मारहाण करण्याची शक्यता आहे.तुम्ही लवकर या असे म्हणाली असता फिर्यादी मोटार सायकल पॅशन पल्स.क्र.MH44,AC 7962 वरुन शिवाजीचौक धारुर येथील आई मेडिकल येथे 6.05 वाजता आला असता तेथे लोकांचा जमाव जमलेला होता.यावेळी कुलदीप बाबासाहेब जगताप रा.आवरगांव,महेश देशमुख रा.आवरगांव या दोघांनी कल्पना अनंत जाधवला मारहाण करत अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते.त्यांना  हे मारहाण का करता? असे विचारले असता तरी ते कल्पना जाधव यांना मारीत होते.लागलीच इतर अनोळखीचे तिन लोक हे लाथाबुक्क्याने फिर्यादीस शिवीगाळ करत ह्या महारड्याचि आता जिरवायचि,लई माजलाय हा.असे म्हणत लाठ्या-काठ्या व धारधार शस्त्राने जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. डॉ.महेश देशमुख हा बांबुच्या मोठ्या काठीने मारत होता व धावुधावु अंगावर येत होता. त्यानंतर फिर्यादीस कसब्यातील जाडेला व्यक्ती नामे शिनगारे म्हणाला की,तु इथे का आलास? असे म्हणत जोराचा धक्का दिल्याने फिर्यादी खाली पडला व फिर्यादीचा मोबाईल कुलदीप जगताप याने स्वतःकडे घेतला.फिर्यादीने विचारपुस केली मोबाईल परत द्या.तेव्हा कुलदीप बाबासाहेब जगताप,डॉ.महेश देशमुख, रुपेश अशोक जाधव,टक्कल असलेला जाधव, बाळु वेताळ व इतर पाच अनोळखी व्यक्ती यांनी धक्काबुक्की सुरु केली.फिर्यादी यास जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.त्यानंतर कुलदीप जगताप व महेश जाधव,रुपेश जाधव हे मला म्हणाले की, या महारड्याला जिवच मारून टाकु.हा लईच अर्ज करतो.परत लाथाबुक्याने मारहाण चालु केली व जातीवाचक शिवीगाळ केली.त्यानंतर महेश देशमुख याने बांबुने पायावर पाठीमागुन मारहाण सुरु केली.त्यामुळे मला मुक्का मार लागला.त्यावेळी कोणीतरी मला पाठीमागुन माझे उजव्या हाताचे कोप-यावर लोखंडी रॉड मारला व हात फ्रॅक्‍चर करुन डोक्‍यात गंभीर दुखापत झाल्याने सात टाके पडले.तसेच फिर्यादी खाली पडला तेव्हा एटीएम मधुन चार पाच दिवसापुर्वी तिस हजार काढले होते. त्यातील शिल्लक असलेले दहा हजार रुपये खाली पडले व एसीजेपीचे लेटरपॅड पण खाली पडले.ते लेटरपॅड कुलदीपने आपल्या पायदळी तुडवले.त्या लेटर पॅडमध्ये संघटनेचा लोगो व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे.तो म्हणाला की,हे तुझा बाबासाहेब आंबेडकर माझ्या पायाखाली बघ कसा तुडवतो.ते लेटरपॅड ताब्यात घेण्यासाठी फिर्यादी पुढे सरकला असता महेश देशमुख याने समोरुन येवुन दोन्ही हाताने बांबुची काठी घेवुन फिर्यादीचे पाठीत मारहाण केली व शेजारी असलेल्या लोकांनी पण काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण चालु केली.नंतर त्याचे डोक्यात जोरजोरात लाथा घातल्या व डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली.त्यामुळे डोक्याचे मागच्या बाजुस गंभीर जखम झाली.
नंतर माझ्या मानेवर बांबूच्या काठीने मारहाण केली.तेथे फिर्यादी बेशुध्द पडला.थोड्या वेळाने फिर्यादी उठुन पाहीले असता जमाव पांगला होता.आई मेडीकल वाल्याने मेडीकल बंद केले व मोबाईल बघत असताना कुलदीप म्हणाला की,आम्ही मराठे एकदा वस्तु घेतल्यावर परत करीत नाहीत.या महारड्या सारखी लाचार जिंदगी जगत नाहीत. 
       आम्ही एकतर ठार मारतोत आता तरी तु धडा घे. जर तु ही फिर्याद केलीस तर पुढे तुला व तुझ्या कुटुंबीयाला सर्व मराठा समाज एकजुट होवुन तुमचा घातपात करून टाकु.तु तुझी जुन 2024 महीण्यातली अट्रोशिटीची फिर्याद वापस घे,असे म्हणाला.फिर्यादी वापरत असलेला मोबाईल कुलदीप घेवुन गेला.सदर भांडणाचा प्रकार उत्तरेश्वर महादेव जाधव रा.धाराशीव जात मराठा याचे सांगण्यावरून झालेला आहे.या घटनेचे साक्षीदार कल्पना अनंत जाधव व विल्सन उंबरे हे परळीहुन धारूर कोर्टात हजर रहाण्यासाठी आले होते.कोर्टातुन परत जाताना हा प्रकार घडला.त्याचे साक्षीदार आहेत.तेथुन फिर्यादी केज डिवायएसपी ऑफीस येथे गेला तेथे साहेब नसल्या करणाने तो तेथे असलेल्या पिएसआय शेळके यांना घटना सांगीतली.त्यानंतर त्यांनी धारुर पोलीस स्टेशनला फोन करुन कार्यवाही करण्यास सांगीतले.तेथुन फिर्यादीस धारुर पोलीस स्टेशनने पत्र दिल्याने सरकारी दवाखान्यात धारुर येथे गेलो असता तेथील डॉक्टरांनी फिर्यादीला प्राथमीक उपचार करून अंबाजोगाई येथे पाठवीले.तेथे उपचार करुन 25/8/2024 रोजी पो. स्टे.ला येवुन फिर्यादीने नामे कुलदीप बाबासाहेब जगताप,डॉ.महेश देश‌मुख दोन्ही रा.आवरगांव,रुपेश अशोक जाधव,टक्कल असलेला जाधव,बाळु वेताळ तिघे रा.धारूर,उत्तरेश्वर महादेव जाधव रा. धाराशीव,जाडेला व्यक्ती शिनगारे व इतर पाच अनोळखी व्यक्ती यांचे विरुध्द गुन्हा र.नं.244/ 2024,भारतीय न्याय संहिता ब 304(2) प्रमाणे कलम 115(2)117(2),118(1),304(2),303 (1),189(2),191(2),193(3),189(4),190, तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा1989 अन्वये 3(1)(r),3(1)(s),3(1)(t),3(2)(va) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापरावर लातूर पोलिस करणार कठोर कारवाई.*

              लातूर (पोअका) : राष्ट्रीय हरित लवाद (National Green Tribunal – NGT) यांनी पर्यावरण संरक्षण, पक्षी-प्राणी जीवित, तस...

लोकप्रिय बातम्या