*पोलीस ठाणे गांधी चौक येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक.*

     लातूर : लातूर शहरात दिनांक 08/10/2024 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक जवळ मोटरसायकल ला धडक दिल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी काही तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
       सदरच्या घटनेतील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादवरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा क्रमांक 652/2024 कलम 103 (1), 109, 115, 351(2), 351(3) 3 (5) बी. एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
       घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी  लातूर, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे चे पथके तयार करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता. 
       पथकांनी तात्काळ कारवाई करत गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून अवघ्या काही तासातच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे 1) राजपाल उर्फ राजू विठ्ठलराव गायकवाड, वय 33 वर्ष, राहणार विक्रम नगर, लातूर. 2) अजय सोमनाथ घोडके, वय 27 वर्ष, राहणार जुनी लेबर कॉलनी, लातूर. 3) प्रवीण बाबुराव कांबळे, वय 40 वर्ष, सावित्रीबाई फुले नगर नांदेड सध्या राहणार एलआयसी कॉलनी लातूर. अशी असून वरिष्ठांचे व गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.आर. कऱ्हे हे पुढील तपास करीत आहेत. 
        स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे एमआयडीसीच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय शीघ्रगतीने कार्यवाही करत गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून तात्काळ अटक केली आहे. सदर घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे,सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन पथकाना उपयुक्त सूचना केल्या. तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी साहेबराव नरवाडे, दिलीप सागर, अरविंद पवार, संतोष पाटील यांनी रात्रीतून आपापले पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवून शांतता अबाधित ठेवली
       सदरच्या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अंमलदार  विनोद चिलमे, खुर्रम काझी, दिनानाथ देवकते, रियाज सौदागर, युवराज गिरी, जमीर शेख, राजेश कंचे, संतोष देवडे,चालक अमलदार बंडू नीटुरे यांच्यासह पोलिस ठाणे एमआयडीसी चे पोलीस अंमलदार सचिन कांबळे, अर्जुन राजपूत, विनोद कातळे यांचा समावेश होता.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या