संचारबंदीतही कंपनीत शटर ओढून काम सुरु; तुकाराम मुंढेंनी दिला दणका


  • संचारबंदीतही कंपनीत शटर ओढून काम सुरु; तुकाराम मुंढेंनी दिला दणका



      नागपूर - करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नागरी भागात सर्वत्र संचारबंदी लागू असतानाही या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या दोन खासगी कंपन्यांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच दणका दिला आहे. या कंपन्यांकडून कार्यालयाचे शटर ओढून कर्मचार्‍यांकडून काम करुन घेतले जात होते.
     राज्यात ३१ मार्चपर्यंत नागरी भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याने शहरातील अत्यावश्यक सेवा-सुविधा वगळता सर्व खासगी कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, बर्‍याच कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरात बसून काम करण्याची मुभा दिली आहे. मात्र, तरीही इथल्या वर्धमान नगरमधील एका कंपनीत सुमारे ६०-७० कामगारांना कंपनीने कामावर बोलावलं होतं. कंपनीचे शटर बंद करुन त्यांच्याकडून काम करुन घेतलं जात होतं. याची माहिती मिळताच पालिकेच्या पथकाने तिथे धाड टाकली आणि कंपनीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
त्याचबरोबर वर्धमान नगरमधीलच एका वाहन कंपनीच्या शोरुममध्येही अशाच प्रकारे कामगारांना कामावर बोलावण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या अधिकार्‍यांनी तिथेही धाड टाकली. शोरुमच्या मालकाला या पथकाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
     दरम्यान, प्रशासनाकडून वारंवार गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत असताना तसेच संचारबंदीचे कायदेशीर आदेश काढले असतानाही जर लोक ऐकत नसतील तर त्यांच्यावर यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या