लॉकडाउनला अडचण आली तर लष्कराला पाचारण
मुंबई ः (लातूर प्रभात प्र.) ः भयभित कोरोना रोगाने जनजिवन विस्कळीत झाले असले तरी या रोगाचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रारंभी जनता संचार बंदी लागू करण्यात आली. पंरतू यात लॉकडाउन लागू केल्यामूळे जनतेचे सहकार्य मिळत नाही. वरचेवर कोरोना रोगाची लागण वाढू लागल्याने लॉकडाउन जाहिर केले असले तरी त्यास अडसर निर्माण होतो आहे. प्रतिबंधासाठी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्ता निर्माण झाली तर लष्कराला पाचारण करु असा स्पष्ट इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री अजित पवार यांनी दिला असून तसे पत्र ही त्यांनी लष्कर प्रमुखाना पाठविल्याचे गृहमंत्रालयातून संागण्यात आले. दरम्यान उरण कुलाबा सागरातून बोटी द्वारे लॉकडाउनचे उलंघन करुन ३४ प्रवाशाची वाहतूक केल्याने बोटी मालक चालकावर जिल्हाधिकारी कुलाबा यांनी कारवाई करुन गुन्हा नोंद केला आहे. तर मुंबई मार्केट मध्ये गर्दी वाढल्याने तिथे पाबंदी करुन मार्केटच दुसरीकडे हालविल्याचे महापौरांनी सांगीतले. यातच कोरोना रोगाच्या प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी गायक कलाकार सरसावले असून आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी ही मोहिम हाती घेतली असून त्यांचा जनजागृती कार्यक्रम सुरु आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्ण यांना उपचार सर्वसोयीसुविधा व्हाव्यात, कोरोना रोगाचे गांभिर्य लक्षात घेवून शिवसेनेच्या सर्वच आमदारानी एक महिन्याचा पगार तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच खासदार आमदारानी एक महिण्याचा पगार दिला असून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही एक महिण्याचा पगार दिला असून महाराष्ट्र सरकारकडे ही मदतीचा ओघ वाढल्याचे चित्र दिसते आहे.