जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्यामुळे परिस्थिती आटोक्यात
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः कोरोना रोगाची लातूर जिल्ह्यात लागन झाली. शासकीय रुग्णालयाकडे रिघ लागली. जनता कर्फ्यू जारी केला, यामुळे संचार बंदीची गरजच काय म्हणून जिल्हाधिकारी जी श्रीकांत व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या बद्दल जनतेत नाराजी व्यक्त होताना दिसत होती. पण कोरोना रोगाचे वास्तव आणि गांभीर्य लक्षात येताच नागरीकांनी संचार बंदीला सहमती देवून सहकार्याची भुमिका घेतली होती.
अशातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कठोर जनता संचार बंदी जाहिर केल्याने पुन्हा नागरीकांनी उचल खाल्ली. पंरतू जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कार्यपध्दती व मार्गदर्शनामुळे जनतेचे समाधान झाले, त्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांचेही सहकार्य लाभत असल्यामूळे आजघडीला लातूर शहर व जिल्ह्यातील परिस्थिती केवळ जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शन व कसोटीमुळेच आटोक्यात आहे, असे दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने जिल्हाभरातील शहरी पाहणी केल्यानंतर लक्षात आल्याचे चित्र दिसते आहे.