कोरोना विषाणुच्या ओढवलेल्या संकटाच्या पाश्वभुमिवर
२१ मार्च रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करणार नाही
व कार्यकर्त्यांनी सुध्दा साजरा करु नये
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
सध्या उद्भवलेल्या कोरोना विषाणु संकटाच्या पार्श्वभूमीवर येत्या २१ मार्च रोजी येणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही आणि कार्यकर्त्यांनीही तो साजरा करु नये असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
सध्या कोरोना विषाणु पासुनच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत आणि याची कठोर अंमलबजावणी होत आहे. या परिस्थितीत माझ्या वाढदिवसानिमित्त एकत्रित येवून कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेणे उचित ठरणार नाही. मतदारसंघातील व इतरत्र असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी ही परिस्थिती लक्षात घ्यावी आणि समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेऊ नयेत असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.