*लातूर जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा व अवैध मद्यविक्रीविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; ७५ गुन्हे दाखल, ९,९४,५१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त.*

       लातूर (पोअका) : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्यविक्रीसारख्या समाजविघातक धंद्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दल यांच्यामार्फत सातत्यपूर्ण, कठोर कारवाया राबविण्यात येत आहेत. श्री अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर व श्री मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या समन्वयाने अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
      दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक धाडसत्रे, गुप्त माहितीच्या आधारे छापे, तसेच सतत गस्त व पाहणी मोहिमा राबविण्यात आल्या. सदरच्या एकत्रित कारवाईमध्ये...
🔹 मटका / जुगार व दारूबंदी कायद्यांतर्गत – २९ गुन्हे दाखल.
🔹 अवैध मद्यविक्री प्रकरणी – ५३ गुन्हे दाखल.
🔹 गुटखा विक्री प्रकरणी – ०३ गुन्हे दाखल.
        अशा एकूण ७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या कारवाईत विविध प्रकारचा मुद्देमाल जसे की रोख रक्कम, जुगार साहित्य, अवैध मद्यसाठा, तसेच गुटखा साठा असा एकूण ₹ ९,९४,५१४/- (रुपये नऊ लाख चौ-याण्णव हजार पाचशे चौदा) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
        नमूद गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच संबंधित आरोपी भविष्यात पुन्हा अशा अवैध कृत्यांत सहभागी होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
        अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार असून अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा व अवैध मद्यविक्रीविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; ७५ गुन्हे दाखल, ९,९४,५१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त.*

       लातूर (पोअका) : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्यव...

लोकप्रिय बातम्या