जिल्हयातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना बाह्यरुग्ण्‍ सेवा बंद ठेवण्याचे आदेश


  • जिल्हयातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना

  • बाह्यरुग्ण्‍ सेवा बंद ठेवण्याचे आदेश


लातूर,:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. त्या अन्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.


जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी जिल्हयात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लातूर जिल्हयातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना पुढील प्रमाणे निर्देशित करण्यात येत आहे.


खाजगी दवाखान्यातील बाहयरुग्ण्‍ तपासणी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणे, पूर्वनियोजित शस्त्रक्रिया (Elective Surgery) पुढे ढकलण्यात यावीत. आंतररुग्ण्‍ विभागातील सेवा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरु राहतील. कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यकता भासल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 65 चा वापर करुन खाजगी वैद्यकीय व्यावसाईक, त्यांचे अधिनस्त कर्मचारी व इमारत परिसर आणि तत्सम संसाधने अधिगृहित करण्यात येऊ शकतात.


या आदेशाचे अंमलबजावणी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त यंत्रणेमार्फत करुन तसा अनुपालन अहवाल सादर करावा. या कामात अधिकारी /कर्मचारी यांचेकडून कुचराई/ दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 मधील तरतूद व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ,2005 च्या कलम 51 व इतर अनुषंगिक कायदयानुसार कारवाई करण्यात येईल,असे आदेश नमुद करण्यात आलेले आहे.


तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनाधारका विरुध्द भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी निर्देशित केले आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या