संपादकीय...

संपादकीय...


कोरोनातील रोना कशासाठी


जगभरातील संसर्गजन्य रोगाच्या भयाने जगभरातील जनता भयभीत झालेली आहे.  कोरोना किंवा करोना हा रोग मांस खाल्याने होतो की, कोणातरी मांसाहारी व्यक्तीच्या संसर्गाने हातो.  हे अध्यापही सिध्द झाले नाही.  तरी ही कोरोनातील रोना हे केंद्र सरकारचे कार्य काय सिध्द करु पाहत आहे, हेच कळेनासे झाले आहे.  कोरोना रोग हा, घातक आहे.  जगभरातील जनतेसह भारतातील नागरीकही भयभीत झालेले आहेत.  त्यातच भारताचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकप्रतिनिधीसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञाशी चर्चा करुन अशा या घातकी रोगांशी सामना करण्यासाठी सज्ज रहावे असे अहवान केले आहे.  ते वास्तवाचे भान असावे अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.  
 कोरोना हा रोग संसर्गजन्य रोग आहे, त्यात सामाजीक भान भयभीत करण्यासाठी प्रसार माध्यमे जाणीवपूर्वक प्रसार प्रचार करीत असताना दिसतात.  त्यामूळे हे भय कसे काय कोण निर्माण करीत आहेत, याचे गुपीत कळणे संशायात्मक असले तरी ती सुई केंद्र सरकारवर फिरु शकते अशी उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.  कारण असे की, कोरोना हा संसर्गजन्य रोग प्रसारातच आहे.  त्यात संशयीत रुग्ण त्यातील अफवा आणि त्यातून होणारे समज गैर समज असे दुराभास्त होत असताना देशपातळीवरील शासकीय यंत्रणा आणि राज्या राज्यातील वैद्यकीय यंत्रणा या कोरोनातील रोना समोर ठेवूनच सर्वसामान्य जनतेची दिशाभुल करीत आहेत की काय अशीच चर्चा होताना दिसते आहे. 
 कारण असे की, मांस खाल्यामुळे कोरोना रोग होतो, हा भास चीन निर्माण केला गेला.  त्याचा पसारा जगभरात वाढला गेला.  पाच ते दहा देशात रोग पसरला पण भारतात आला नाही.  केवळ परदेशातून आलेल्या नागरीकांच्या भितीने भारतीय प्रशासनाने गंभीर वातावरण निर्माण केले.  आणि त्या भितीमुळेच केवळ राजकीय गौडबंगाल समोर आले.  त्यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राजकीय खेळीचेच हासु होताना दिसते आहे.  
 कारण असे की, आजघडीला केवळ नागरीकत्व दुरुस्ती कायदा नोंदणी व जनगणना मोजनी अशा कायद्यामुळे देशभरात विरोधी आंदोलन चालू असताना त्याकडे दलित, बहुजन, ओबीसी, मुस्लिम लोकांच्या हक्काकडे दुर्लक्ष करणेसाठी जाणीपूर्वक कोरोना रोगाचे भुत केंद्र सरकारने देशासमोर ठेवल्याने आम नागरीक विचलीत झाल्याचीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.  हे टाळता येण्यासारखे नाही.  
 कोरोना संदर्भात केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकाने जी कांही भुमिका घेतली ती योग्यच आहे.  पण जनतेची दिशाभुल करुन कोणत्यातरी विषयावरुन नागरीकांचे मन विचलीत करणे ही बाब सामाजीक न्यायाला बाधा आणारी अशीच असावी अशी चर्चा होताना दिसते आहे.  हे वास्तव कोणी ही नाकारु शकत नाही.  अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.  भारतीय नागरीक हे शिस्तीचे पालक आहेत.  ते भारतीय संविधानांच्या बांधील आहेत, तरी ही सामाजीक राजकीय, धार्मीक घडामोडी घडत असतात.  पंरतू सामाजीक जातीय सलोखा धर्मनिरपेक्षतेता राष्ट्रीय एकात्मता जोपासून त्याचे रंक्षन करण्यासाठी सर्वजन सहभागी होत असताना कोरोनाचे भुत उभे करुन जनते मध्ये घबहराट करणे जनतेची दिशाभुल करणे ही शासकीय यंत्रणेची चाल देश घातकीच ठरु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तूळात होताना दिसते आहे.  या संदर्भात प्रसार माध्यमातून सडेतोड चर्चा होत नसल्याने प्रसार माध्यमाच्या बाबीत उलटसूलट चर्चा होत असून कोरोनातील प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा रोना कशाला अशी चर्चा होताना दिसते आहे.  वास्तविक चर्चा आणि पर्यावरण पाहता सरकारी यंत्रणा कमी पडते आहे.  त्यात कोरोनातील रोना हा घातक पर्याय मोदी सरकार स्विकारत आहे की काय, अशीच चर्चा सर्वत्र होत असली तरी कोरोनातील रोना कशासाठी हाच सवाल सर्वनागरीकांना भेडसावताना दिसतो आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या