मराठवाड्यातील तमाम नदीपात्रे वाळू माफीयानी काबीज केली

मराठवाड्यातील तमाम नदीपात्रे वाळू माफीयानी काबीज केली ? 



        औरंगाबाद (दै.लातूर प्रभात प्र.) ः मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून वहाणार्‍या नदीपात्रातून अवैद्य वाळू उपसा होत आहे.  तक्रारी आल्या, वृत्तपत्रातून बातम्या आल्या, महसूल विभागाने छापे घातले, कारवाया केल्या, दंड वसूल केला तरीही राजरोसपणे अवैद्य वाळू उपसा होतो आहे.  शासकीय गौण खनिजाचे नुकसान होते आहे.  महसूल बुडतो आहे पण महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी, पेालीस कर्मचारी आपापला पगार चालू आहे तर वाळू माफीयाच्या नादी लागून जीव धोक्यात कशाला घालावा यासाठीच वाळू उपसा करणार्‍याना महसूल विभाग, पोलीस यंत्रणा वाव देत असेल अशीच चर्चा होताना दिसते आहे. 
      वाळू उपसा, वहातूक,तस्करीवर गुन्हे होतात, धाडी, पडतात तरीही वाळू उपसा होतच असतो.  त्यामूळे स्थानीक पुढार्‍यानी अनाधिकृतपणे आपापल्या भागातील नदीपात्रे वाळू माफीयाना दान केली की वाळू तस्करानी ती काबीज केली अशीच उलटसूलट चर्चा त्या त्या भागातील शेतकर्‍यात होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या