लातूर (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, खालील मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे. 1. माणकेश्वर - उदगीर मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. 2. बोटकुळ निलंगा मार्गावर पुलावरून पाणी वाहत आहे. 3. अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत आहे. उदगीर-अतनूर-बाराळी रस्ता बंद आहे. 4. उटी व अलमला रस्त्यावर पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. 5. दैठणा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. 6. औसा ते हसलगन रोडवर जवळगावाडी येथे पुलावरून पाणी जात असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक बंद आहे. 7. एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बंद आहे. 8. धडकनाळ बोरगाव च्या पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 9. मौ शेळगाव तालुका चाकुर मध्ये तिरु नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. 10. सिंगनाळ ता. निलंगा येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सिंगनाळ येथील वाहतूक बंद आहे 11. ढोरसांगवी गावचा संपर्क तुटला नदी वरून पाणी जात आहे 12. उस्तुरी ते टाकळी ता. निलंगा येथील ओद्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने उस्तुरी येथील वाहतूक बंद आहे. 13. हालसी (तु.) वरून तुगाव जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पाणी आल्यामुळे रस्ता बंद आहे. 14. वायगाव पाटी ते गादेवाडी तालुका अहमदपूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे 15. हासोरी खुर्द ते हासोरी बु ता. निलंगा जाणाऱ्या रस्त्यावर पुलावरून पाणी वाहत आहे रस्ता बंद आहे. 16. मौजे शेणकुड येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे बरेच दिवसापासून हा मार्ग बंद झाला आहे पण ढालेगाव आणि सांगवी सु असे दोन पर्यायी मार्ग चालू आहेत. 17. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नळेगाव सज्जातील हटकरवाडी एक या गावातील नदीला आलेल्या पुरामुळे हटकरवाडी ते नळेगाव हा रस्ता बंद झालेला असून पुलाच्या वरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे. 18. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे.19. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे. 20. हालसी हा. ओढ्यावरून पाणी जात आहे त्यामुळे हालसी ते हातरगा रस्ता बंद आहे. 21. अहमदपूर तालुका हासरणी ते उन्नी जांब रस्त्याच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे सदरील रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्ता हाडोळती मार्गे आहे 22. मौजे शिरूर अनंतपाळ ते नागेवाडी जाणारा घरणी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. 23. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे. 24. निलंगा तालुक्यातील मौ. शिवणी को. ते आनंदवाडी शि.को. येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मौ. शिवणी को. ते आनंदवाडी शि.को. येथील वाहतूक बंद आहे. 25. आनंदवाडी सुनेगाव पुलावरून पाणी गेल्यामुळे सदरील रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. 26. औराद - वांजरखेडा नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. 27. सोनखेड ता. निलंगा किटीअवेर पुलावरून पाणी. 28. औराद शहाजानी ता. निलंगा ते भालकी जाणाऱ्या रस्त्यावर भातंबरा गावात जवळ नदीचे पाणी रस्त्यावर वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे.
29. चिलवंतवाडी ते कासार बालकुंद रस्त्यावर पाणी असल्यामुळे गाडी बंद आहे. 30. शिरूर अनंतपाळ जवळ घरणी नदी ला पाणी आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील कानेगाव व टाकळी बसेस नळेगाव येरोळमोड मोड मार्गे मार्गस्थ करण्याचे सुचना आहेत. 31. वरवंटी ते शिंदगी च्या मधील पुलावरून पाणी जात आहे. 32. लातूर - निजामाबाद मार्गावर नरसी येथे नदीपुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद आहे. 33. उदगीर निझामाबाद मार्ग मुखेड नियत नरसी व बिलोली च्या मध्ये तळणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने सदरची वाहतूक बंद आहे. त्यामुळे सदरचे नियत नरसी येथून परत बोलावले आहे. 34. शिरूर अनंतपाळ ते येरोळ-उदगीर जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. 35. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे रस्ता बंद झाला आहे. 36. शिरशी तालुका लातूर सरहद्द ते धानोरा ते ईजिमा-115 रस्त्यावरील साखळी क्रमांक 0/700 येथील नळकांडी पुलाजवळ भराव वाहून गेल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक होऊन रस्ता बंद आहे.
37. औसा तालुका मौजे पोमादेवी जवळगा ते संक्राळ रस्त्याच्या पुलावर पुराचे पाणी आलेले आहे, वाहतुकीसाठी रस्ता बंद केलेला आहे. 38. जळकोट तालुक्यातील ढोरसंगवी आणि धनगरवाडी या गावाचा लाळी बु पुलावरून पाणी जात असल्याने सम्पर्क तुटला आहे. 39. नावंदी ते उदगीर ग्रामरस्तावरील ओढ्याला पूर आल्याने सध्या बंद करण्यात आला आहे. 40. मौजे सावरगाव थोट तालुका अहमदपूर या गावातील सर्व पुलाहून पाणी जात आहे. पर्यायी रस्ता नाही. 41. मौ. शेडोळ ता. निलंगा ओढ्याच्या पाण्यामुळे रस्ता बंद असून योग्य ती दक्षता घेण्याबद्दल गावाकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
*नागरिकांना आवाहन*
नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना, नदीकाठी वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कृपया, नदीपात्रात जाणे टाळा, आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन...1. नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. 2. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. 3. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. 4. पाऊस सुरु असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. 5. जिल्ह्यातील बरेच रस्ते / पुल पाण्याखाली गेले असून या ठिकाणावरून पाण्याचा स्तर कमी होईपर्यंत कोणीही स्वतः किंवा वाहनासह रस्ता / पुल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. 6. नागरिकांनी शक्यतो आप-आपल्या घरीच राहावे. तसेच घराबाहेर असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, 7. जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून स्वतःची / आपल्या कुटूंबाची/आपल्या पशूधनाची काळजी घ्यावी.
****