255 प्रवाशांनी स्वतःहून तपासणी करून घेतली * कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग 24 तासात सुरू होणार -अधिष्ठता डॉ. गिरीश ठाकूर *आजपासून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत थर्मल ओपीडीची सुरुवात


  •   255 प्रवाशांनी स्वतःहून तपासणी करून घेतली

  • * कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग 24 तासात सुरू होणार -अधिष्ठता डॉ. गिरीश ठाकूर

  • *आजपासून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत थर्मल ओपीडीची सुरुवात


लातुर,:-  येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 21 मार्च.2020 रोजी दुपारपर्यंत एकुण 255 व्यक्तींनी स्वत:हुन येवुन तपासणी केली. मुख्यत: पुणे व मुंबई हुन आलेले प्रवासी त्यात होते. त्यापैकी 02  व्यक्तींचे  स्वॅब राष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन त्या दोन व्यक्तींचे अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन ठेवण्यात आले आहे. तसेच या संस्थेत दिनांक  22 मार्च 2020 पासून थर्मल ओपीडी ची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.


      या वैद्यकीय विज्ञान संस्थेत  कोरोना  विषाणूची लागण झाल्यापासून आजपर्यंत एकुण 422 रुग्णांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी ३० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन 8 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. एकुण २८ जणांना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined  करण्यात आले आहे.


          संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आदेशानुसार कोरोना बाधित / संशियत रुग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग सुरु करण्याबाबत निर्देश दिले असल्यामुळे येत्या 10-12 दिवसात नविन 24 खाटांचा सुसज्ज अतिदक्षता विभाग 24 तास कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. तसेच याकरिता शासनाकडुन ६ व्हेंटीलेटर प्राप्त होणार असुन व इतर आवश्यक यंत्रसामुग्री, साहित्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त होणार आहेत. 


       कोरोना संशयित / बाधित रुग्णांसाठी वाढीव ३० खाटांचा विलगीकरण कक्ष या संस्थेच्या नेत्रचिकित्साशास्त्र विभाग, गांधी चौक येथे सुरु करण्यात येणार असुन एकुण 97 खाटा  दिनांक 23 मार्च 2020 रोजी सायंकाळ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार  आहे. तसेच ज्या व्यक्तींना ताप आली आहे अशा व्यक्तींसाठी स्वतंत्र Thermal O.P.D. ही दिनांक 22 मार्च 2020 रोजी पासुन सुरु करण्यात येणार आहे. 


महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वत: कडे असलेले Thermal Scanner (ताप मोजण्याचे साधन) हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेला दिले आहे, अशी माहिती डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या