लातूर मनपाची कोरोना विरोधी आदर्शात्मक कारवाई
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह लातूरात ही संसर्गजन्य संशयीत कोरोना रुग्णाचे थैमान माजले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे. त्यातच लातूर महानगर पालिकेनेही कोरोना विरोधी आदर्शात्मक कारवाई करणेसाठी पुढाकार घेतला असून लातूर मनपाचे महापौर नियमित प्रमाणेच लातूर शहराचा विकास स्वच्छता राखणेसाठी आम्ही या योजना राबवीत आहोत, त्या योजना प्रस्तावीत आहेत, त्यामूळे लातूर शहर विकासासह रोग मुक्त रहिल अशी ग्वाही नेहमीच देत असतात. ही बाब त्यांच्यासह लातूरकरांनाही आनंददायीच असावी अशी चर्चा होत गेलेली आहे. आजघडीला कोरोना रोगामुळे जनता भयभित झालेली आहे. त्यास प्रतिबंद करावा यासाठी लातूर मनपाच्या महापौरांनी राज्यातील महानगरपालिकांनी आदर्श घ्यावा अशीच कारवाई मनपाचे महापौर करीत असताना दिसतात.
लातूर शहरातील नाली सफाई करणारे महिला पुरुष कर्मचारी हे मनपा व सेवाभावी संस्थेचे आहेत. कोरोना रुग्णासाठी मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातील गटारी, स्वच्छ राहाव्यात, रोगराई होवू नये, कोरोनातर पसरुच नये, यासाठी नाली सफाई काम करणे, तत्परतेने होत असून, महिला पुरुष कर्मचारी नाली सफाई करताना दिसतात. या कर्मचार्याच्या हाताना हातमोजे नाहीत, तोंडाला, मास्क नाही, किंवा पायात शुज नाहीत, हे दृश्य दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने पाहिले, लातूर शहरातील नागरीकांची काळजी घेता, पण लातूर मनपा कर्मचार्यांची काळजी का नाही, असा प्रश्न सफाई मुकादमाला विचारला असता, आम्हाला काय माहित महापौराना विचारा, असे सांगीतल्यामूळे किमान मनपा कर्मचार्याना कोरोना मुक्त ठेवण्यासाठी तरी महापौरानी काळजी घ्यावी, लातूरची जनता स्वंयभु आहे,अशी ही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
गंजगोलाई स्वच्छता मोहिमेतून अनेकांना तेथून हलविले, त्यांचे पुनर्वसन केले गेले नाही, आजघडीला भाजी विक्रेते तेथे व्यवसाय करतात. त्याच्या आसनासाठी मध्यभागी दोन तीन फुटाचा अंतर ठेवून तशी व्यवस्था करणार असल्याचे महापौर संागतात, अतिक्रमनातील कर भरणार्या भाडेकरुंचे पुनर्वसन का झाले नाही, मग कोनाचे काय करणार, आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मनपा सफाई कर्मचार्यासह लातूर शहरातील जनतेसाठी काय करणार अशी ही चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.