कोरोना प्रतिकारासाठी जनतेचा पुढाकार असताना त्यांनाच डांबून कसे चालणार

कोरोना प्रतिकारासाठी जनतेचा पुढाकार असताना त्यांनाच डांबून कसे चालणार


मुंबई (लातूर प्रभात प्र.) ः कोरोना रोगाने सार्‍या जगाला भयभित केले आहे.  भारतात तर केवळ संशयानेच ग्रासले आहे.  त्यातच प्रत्येकाना जगावे लागते, ही अपेक्षाच असते, यासाठी संसर्गजन्य कोरोना रोगाच्या भितीने आपापल्या रंक्षणासाठी वेगवेगळे उपाय शोधून जनता रोजचे व्यवहार करीत होती.  याचा संधीचा फायदा घेवून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता संचार बंदीचे अहवान केले.  तसे आदेश ही जारी केले.  पंरतू नागरीकच कोरोना प्रतिकारासाठी सज्ज असल्याने लातूरसह देशभरात जनता संचार बंदीचे प्रतिकात्मक आंदोलन यशस्वी झाले.  पंरतू राजकीय पक्ष नेत्यांनी थाळी, टाळी वाजवून घंटानाद करुन श्रेय लाटल्याचेच चित्र दिसते आहे. 
 मरणाच्या भितीपोटी जनता सावध होती.  पंरतू केंद्र सरकारने सक्तीने लोकसंचार बंदी लागू करुन आम जनतेलाच घरा, घरात डांबून ठेवल्याने कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई कशी साध्य होणार अशी चर्चा होताना दिसते आहे. संसर्गजन्य रोगासाठी सरकारने शासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ कारवाई करुन कोरोना पसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.  पंरतू संशयीत रुग्णाची आकडेवारी सांगून जनतेलाच भयभत केले.  आणि घरा घरात डांबून ठेवण्याचा आतिताई मार्ग जनतेवर लादला.  ही बाब अन्याय कारकच असावी अशी उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 
 जनता संचार बंदी मुळे घरात कोंडून राहण्याचे आदेश सरकारने दिले.  भांडवलदार, पैसेवाले, कर्मचारी घरात राहतील, पंरतू ज्यांना रोजगार केल्याशिवाय ज्या कामगारांची चुल पेटत नाही, त्यांनी घरात कोंडूनच भुकबळी व्हायचे काय, अशी चर्चा होत असून त्यासाठी सरकारने काय उपाय योजना केल्या, असे प्रश्‍न पुढे येत असताना दिसतात.  
 शरद पवार मुख्यमंत्री असताना किल्लारीत भुकंप झाला.  त्यावेळी त्यांनी तातडीने शासकीय यंत्रणा हालवीली, सेवाभावी संस्थाना आव्हान केले.  मदत होत गेली, तशी कारवाई आज घडताना दिसत नाही.  केंद्र व राज्य सरकार केवळ आदेश, दंडात्मक कारवाईची भिती घालून जनतेला घरात डांबविण्याचीच भाषा करीत असल्याने संतापजनक चर्चा होताना दिसते आहे.  त्यामुळे आपत्तकालीन काळात जनतेला धिर न देता डांबण्याची कारवाई करण्यासाठी आटापिटा कसा, अशी ही उलटसूलटच चर्चा होत असून संचार बंदी काळात सेवा दक्षतेवर असलेले महाराष्ट्रासह लातूरातील पोलीस ही सेवा बजावीत असताना खान्यापिण्यावाचून त्रस्त झाल्याचेच चित्र दिसते आहे. 
 संसर्गजन्य कोरोनाची भिती असल्याने जनता संचार बंदी मुळे, देशभरातील आणि महाराष्ट्रासह सर्वत्रच व्यापार उद्योगावर बंदी घालण्यात आली.  त्यामूळे व्यवहार ठप्प झाले.  महाराष्ट्रासह राज्या राज्याचा आणि केंद्र सरकारचा बंदीमुळे महसूल बुडतो आहे.  रोग नियंत्रणात आल्यानंतर व्यापार उद्योग सुरळीत होतील.  यात संशय नाही.  पंरतू सरकारी महसुल बुडाला त्याचे काय, अशी ही चर्चा होताना दिसते आहे. 
 लोकसंचार बंदी मुळे अर्थव्यवस्था मंदावली, महसुलात घट झाली, त्यासाठी महसुल वसुली व अर्थव्यवस्था सुधारणेसाठी वेगवेगळ्या उपायासह सर्वच कर्मचार्‍याचे एक महिण्याचे पगार घेतील.  ते योग्य असो नसो, पंरतू महसुली घट सावरण्यासाठी न कळत भाववाढ होईल.  आणि त्या भाववाढीतून सामान्य जनतेच्या मानगुटीवर ती भाववाढ बसणार, आणि त्यातूनच महसुली वसुली सरकार करणार.  आणि मग असे झाले, तसे झाले, म्हणून सरकारी कांगावा जनते समोर येणार, यातून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारच, पंरतू अशातून कोरोना निवारण होईल काय, अशी ही चर्चा होताना दिसते आहे.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या