लातूर (पोअका) : राष्ट्रीय हरित लवाद (National Green Tribunal – NGT) यांनी पर्यावरण संरक्षण, पक्षी-प्राणी जीवित, तसेच मानवी सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन/सिंथेटिक मांजावर सर्व प्रकारे संपूर्ण देशभर प्रतिबंध घातला आहे. NGT च्या आदेशानुसार अशा मांजाचा वापर, विक्री, साठवणूक, वाहतूक, निर्माण, वितरण हे सर्व प्रकार गुन्हा मानले जातात.
लातूर जिल्ह्यात व शहरात NGT च्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मांजाचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी आणि जनतेचे प्राण रक्षण करण्यासाठी लातूर जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली आहे.
सर्व पोलीस ठाण्यांना विशेष दक्षता सूचना देण्यात आल्या असून.बाजारपेठ, क्रीडा साहित्य दुकाने, घाऊक विक्रेते, गल्ली-स्तरावरील विक्रेते यांच्यावर कठोर नजर ठेवली जात आहे. नायलॉन मांजाचा वापर किंवा विक्रीमुळे मानवी जीवितास किंवा जनावरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे खालील कलमे लागू होऊ शकतात: कलम 281 BNS – सार्वजनिक सुरक्षिततेला धोका उत्पन्न करणारी कृत्ये. कलम 273 BNS – मनुष्य किंवा प्राण्यांच्या जीवितास धोकादायक पदार्थांचा व्यवसाय.
कलम 336 BNS – निष्काळजीपणे जीवितास धोका निर्माण करणे. कलम 337/338 BNS – निष्काळजी कृतीमुळे इजा/गंभीर इजा. तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कलम 37(1)(3) – मनाई आदेशाचे उल्लंघन अशा विविध प्रकारच्या कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय हरित लवाद (NGT) ने NGT च्या 2017 व 2020 च्या निर्णयानुसार, देशभर प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर हा थेट गुन्हा मानला जातो. उल्लंघन करणाऱ्यांवर आर्थिक दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार असून दुकानदारांकडील प्रतिबंधित मांजा जप्त करून प्रतिबंधित मांजा चे विक्रेते, साठवणूक करणारे व वापर करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनी नायलॉन/चायनीज मांजा वापरू नये. अशा मांजाची विक्री किंवा वापर आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे. पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण न करता सुरक्षित पतंगबाजी करावी. लहान मुलांना प्रतिबंधित मांजाचा धोका समजावून सांगावे. “NGT च्या आदेशांचे काटेकोर पालन करून लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा मानव-प्राणी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या बेकायदेशीर व्यापारात गुंतलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.”
प्रत्येक पोलीस ठाण्याने सूचना देण्यात आल्या असून बाजारपेठेतील अचानक छापे टाकावेत. सोशल मीडिया व ऑनलाइन विक्रीवर विशेष नजर ठेवावी.शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती मोहिमा राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लातूर पोलिसांकडून NGT च्या आदेशांचे काटेकोर पालन करून प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणारे, साठवणूक करणारे व वापर करणाऱ्यांवर कठोरात कठोर आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.