लातूर, दि. १० : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल् कार्यक्रमानुसार निलंगा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. तसेच दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे २० डिसेंबर रोजी निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच २१ डिसेंबर रोजी उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीची मतमोजणी होणाऱ्या ठिकाणची सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा, १९४९ व महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, मद्यविक्री नोंदवही इ.) नियम १९६९ च्या संबंधित कलमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.
*****