जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय मतदान केंद्र, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

      लातूरदि. २६ : राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुदार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार लातूर जिल्हा परिषद निवडणूक विभाग व त्याअंतर्गत सर्व पंचायत समितीच्या निर्वाचक गणनिहाय मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी संबंधीत तहसिल कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध होईल. तरी सर्व नागरीकांनी या यादीचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या