लातूर शहरातील औषधी दुकाने सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत खुली राहणार ..असोशियन चा निर्णय...आवश्यक सेवा 24 तास चालू राहतील 

लातूर शहरातील औषधी दुकाने सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत खुली राहणार ..आवश्यक सेवा 24 तास चालू राहतील 
   


       कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच प्रशासनास सहकार्य करण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. २५ मार्च २०२० पासून  दि. ३१ मार्च २०२० या कालावधीत लातूर शहरातील सर्व औषधी दुकाने सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत खुली राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणास रोखण्यासाठी प्रशासन स्तरांवर  सर्वतोपरी उपाय योजना केल्या जात आहेत. प्रशासनास सहकार्य करण्यासाठी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त रुग्णांची तात्काळ सेवा सर्व किरकोळ व ठोक औषधी दुकानदारांनी आपल्या कक्षेत घेऊन रुग्णांची  गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे अध्यक्ष बोधकुमार चापसी, सचिव रामदास भोसले यांसह  सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या