कुरघोडी नको सामंजस्याने सरकार चालवा
पुणे (ला.प्र.प्र) ः राजकीय क्षेत्रात चढउतार होतच असतात. पंरतू महाराष्ट्राचे सरकार पडूदेणार नाही, किंवा त्यात व्यत्यय आणनार नाही. पण तिन्ही पक्ष नेतृत्वाने सामंजस्याने कार्य करुन महाराष्ट्राचा विकास साध्य करावा अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. एकमेकावर कुरघोडी होते आहे, असा संशय आल्यामूळे अजित पवारांचे नाव न घेता त्यांना चिमंटा घेवून कोणत्याही परिस्थितीत सरकार टिकले पाहिजे, असे अहवान ही पुणे येथील एका कार्यक्रमात कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना केले.
भाजपाला शह देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील राजकीय गणितासारखीच परिस्थिती केंद्र सरकार मध्ये निर्माण करावी यासाठी मनातील मिस्कीले बाजूला ठेवून महाराष्ट्र केंद्राचा विकास करु शकतो, आजवर केलेला आहे, त्याची परिचिती अनुन देण्यासाठी उद्याचे केंद्रिय सत्तेतील समिकरणे बदलण्यासाठी महाराष्ट्रातील समिकरणाला तडा जावू देवू नका असे ही अहवान करुन शरद पवार यांनी कुरघोडी नको सामंजस्याने सरकार चालवा असे अहवान केल्यामूळे राजकीय वर्तूळात उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.