शासनाच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे कर्तव्य पार पाडावे-जिल्हाधिकारी जी.श्रीकांत


  • शासनाच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे कर्तव्य 
    पार पाडावे-जिल्हाधिकारी जी.श्रीकांत



लातूर : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने शासनाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे आपले कर्तव्य पार पाडून नागरी सुविधा उपलब्ध् करुन दयाव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कोरोना विषाणू प्रादूर्भाव बैठकीत केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी आधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त पेालीसअधिक्षक हिम्मत जाधव, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उपविभागीय अधिकारी, व तहसिलदार उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, जिल्हयातील प्रत्येक विभागाने जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे आपले कर्तव्य पार पाडावे. प्रशासनाने प्रत्येक विभागावर जबाबदारी सोपविलेली आहे. त्याप्रमाणेच सर्वांनी आपले काम करावे व स्वत:ची काळजी घेत इतरांशी संपर्क करण्याचे टाळावे असे सूचित केले.
जिल्हा परिषदेने ग्रामस्तरावर स्वच्छता तसेच कोरोना विषाणू बाबतची परीपत्रक, पॉम्पेट , भिती पत्रके वाटप करुन जनजागृती करावी. तसेच प्रत्येक तालुक्यात नोडल ऑफिसर ची नियुक्ती करावी. कोरोना बाबत नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन उभारलेल्या ठिकाणी जिम्मेदार कर्मचार्‍याची नियुक्ती करावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.
सद्यस्थितीत लातूर जिल्हयात आजतागायत कोरोना बाबत १३ प्रवाशी/सहवासितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी ११ प्रवाशी /सहवासितांचे अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. २ प्रवाशी/सहवासितांचे स्वॅब तपासणी अहवाल येणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग बाबत सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण् नाही.सद्यिस्थतीत लातूर जिल्हयात खीेश्ररींळेप ुरीव मध्ये कोरोना बाधित रुग्ण् दाखल नाही. खबरदारी म्हणून दोन विदेशातून आलेल्या प्रवाशीचे स्वॉब घेण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग बाबत साथीच्या आजावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत औषोधोपचार व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. तरी नागरिकांनी घाबरु नये, काळजी घ्यावी.
महत्वाची सूचना :-कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शंका आली तर घाबरु नका, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, तुम्ही या विषाणूग्रस्त भागात प्रवास केला असेल आणि ताप खोकला आणि श्वास घ्यावयास त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टराचा सल्ला घ्यावा व त्यांच्या सल्याने रुग्णालयात भरती व्हावे. लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या व उपचारासाठी शासकीय रुग्णालयांशी संपर्क करावा,  
राष्टीय कॉल सेंटर क्रमांक. ९१-११-२३९७८०४६, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र. ०२०-२६१२७३९४ व टोल फ्री हेल्पलाईन क्र. १०४ असून लातूर जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र.०२३८२-२४६८०३ असा आहे. या बैठकीस जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या