महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई लातूर जिल्हाध्यक्षपदी अशोक देडे यांची फेरनिवड




    • महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई लातूर 
      जिल्हाध्यक्षपदी अशोक देडे यांची फेरनिवड





लातूर :   महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूरची निवडणूक  लोकशाही पध्दतीने जिल्ह्यातील पञकारांचे मतदान घेवून पार पडली यात प्रचंड मताधिक्य घेवून पूर्वीचेच   अध्यक्ष अशोक देडे  यांची फेरनिवड करण्यात आली. 
      या मतदान प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वृत्तवाहिणी प्रमुख मनिष  केत हे होते .   प्रमुख पाहूणे म्हणून मराठवाडा प्रमुख वैभव  स्वामी उपस्थित होते. राज्य कार्यकारिणीच्या  आदेशानुसार रविवार, दि. १५ मार्च २०२०   रोजी औसा रोडवरील शासकीय विश्रामगृहात  लातूर  जिल्ह्यातील पञकारांची व्यापक बैठक बोलावून ही निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत चार उमेदवार सुरूवातीला उभे राहीले.  परंतू दोघांनी माघार घेतल्याने  सरळ - सरळ अशोक देडे व प्रमोद मोकाशे यांच्यात लढत झाली. मतदान झाल्यानंतर जिल्ह्यातील चार जेष्ठ पञकारासमोर मतमोजणी करण्यात येवून राज्य कार्यकारणी सदस्य मनिष  केत व मराठवाडा प्रमुख वैभव  स्वामी यांनी सर्व पञकारांसमोर  अशोक देडे लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्याचे जाहीर केले.
      जिल्हाध्यक्ष म्हणून निवडून आलेले अशोक देडे  यांनी उपस्थित   जिल्ह्यातील  सर्व पञकारांचे आभार मानले .  संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व राज्य संघटक संजय  भोकरे व राज्य सरचिटणीस विश्वास अरोटे व मराठवाडा प्रमुख वैभव  स्वामी यांचे आभार माणून भविष्यात लातूर जिल्ह्यात पञकारांसाठी अनेक चांगली कामे करू, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी दिली. निवडणुकीस लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थित पञकारांचे  अशोक देडे यांनी आभार  मानले.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या