दारु प्या, उत्पादन शुल्क वाढवा, उत्पादन शुल्क अधिकार्याचा फतवा
लातूर (ला.प्र.प्र) ः हाताला काम नाही, पोटाला भाकरी नाहीत, कर्जबाजारी होवून दारु तर मिळतच नाही, पंरतू दारु शिवाय घर गाठता येत नाही, त्यासाठी कामगारांची अपेक्षा होत असते.
पंरतू हातालाच काम नसेल तर पैसा कोठून येणार, त्यामूळे दळभद्री अवैद्य दारु विक्रेते आणि परवानाधारक देशी दारु विक्रेते अशा या अडचणीत असलेल्या कामगारांना वेठीस धरुन हे आमचे काम करा, अवैद्य दारु विक्री करा किंवा परवानाधारक दारु दुकानाच्या समोरुन वेळ संपल्या नंतर त्याची दारु विक्री करा अशी सोय केल्यामूळे मद्य प्राशन करणार्याना सवलत मिळते, त्यातच अवैद्य दारु विक्रेते आणि परवानाधारक दारु विक्रेत्याना सवलत मिळते, त्यासाठी उत्पादन शुल्क शासकीय अधिकार्यांच्या माध्यमातून परवानाधारक दारु विक्रेत्याना जी सवलत मिळते आहे, आणि त्यातूनच परवानाधारकाच्या माध्यमातून विनापरवाना मद्य विक्र करणार्याना जी सवलत मिळते ती उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या चिरिमिरीच्या व्यवहारातूनच अशी कारवाई होत असावी अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.
बनावटी दारु, देशी दारु, आणि उत्पादन शुल्क कार्यालयातून जप्त केलेल्या देशी, विदेशी दारु विक्रीचा व्यवहार प्रत्येक पोलीस स्टेशन मधून होतो, त्यासाठी उत्पादन शुल्क अधिकार्यांची सहमती असणारच अशीच चर्चा अवैद्य दारु विक्रेत्या मध्ये होताना दिसते आहे.