देशातील तेहतीस कोटी देवांना कोरोनाचे आव्हान---डाॅ.विजय कुमठेकर,जालना*


*देशातील तेहतीस कोटी देवांना कोरोनाचे आव्हान---डाॅ.विजय कुमठेकर,जालना*  
संपूर्ण जगात सर्वात जास्त भेडसावणारा कोरोना आत्ता भारतात प्रवेश केला आहे.जगभरात कोरोना विषाणुंचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने दररोज वाढत आहे.आत्ता पर्यंत ही संख्या एक लाख चोवीस हजारा पर्यंत पोहचली आहे.या साथीमुळे मरण पावलेल्यांची संख्या  पाच हजार  पन्नास झाली आहे.ही साथ संपुर्ण जगभर पसरतच जात आहे.जागतिक आरोग्य संघटनेने तर *जागतिक महामारी* म्हणून जाहीर केले आहे. हा संसर्गजन्य असलेला रोग आपल्या देशात आला आहे तेंव्हा देशातील देवी देवतांची व त्यांच्यावर जीवन जगणार्‍या बुवा बापूं व खिसेकापूंची खरी परीक्षा आहे 
   आपल्या  देशात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्यामुळे जगाला सर्वात जास्त भेडसावणारा हा संसर्गजन्य रोग पळवुन लावण्यासाठी देव देवता व त्यांच्या धर्माच्या ठेकेदारांनी आत्ता पुढे आले पाहीजे व सर्वसामान्य  भयभित झालेल्या  जनतेला दिलासा देण्याचे काम केले पाहीजे.देशातील मंत्री चार्ल्स डार्वीनचा सिद्धांत खोडणारे मंत्री,आपला चमत्कार दाखवुन भोळ्या भाबड्या जनतेला फसविणारे,विज्ञानाला नाकारणारे बुवा बापूंनी पुढे आले पाहीजेत. अनेक धार्मिक मंदिरा मध्ये भक्तांना रोखण्याचे काम पोलीस प्रशासनाला करावे लागत आहे.सरकारला देवी,देवतांचा उत्सव,यात्रा ,धार्मिक कार्यक्रम,सामुदायिक ,शासकीय कार्यक्रम बंद करण्याचा आदेश काढावा लागत आहे तेंव्हा या देवी देवता गप्प का आहेत...???? भारतातील संसर्गीत रुग्णांची संख्या 74 झाली आहे.कोरोनाचा बळी जाऊ नये याची काळजी देशातील आरोग्य विभागाला घ्यावे लागत आहे.
    जगातील ज्या 114 देशांमध्ये हा संसर्गजन्य रोग पसरलेला आहे.तोच रोग आत्ता आपल्या देशात आला आहे.भारतातील तेहतीस कोटी देवांनी या रोगांपासून आपल्या भक्तांना वाचवायला पुढे आले पाहीजेत .पण तसे होतांना दिसत नाही.आपल्या देवांना हिवाळ्यात थंडी जास्त पडली तर स्वेटर घालणारे लोक आहेत.स्वतः दररोज आंघोळ करणार नाहीत पण नित्य नेमाणे देवाला आंघोळ घालणार्‍या  भक्तांची संख्याही आपल्याकडे भरपुर आहे.त्याला वस्र नेसवणारे,पाऊस पडावा म्हणून यज्ञ,याग,होम,हवन करणार्‍यांनी विज्ञानाचा आधार न घेता कोरोनाला दुर पळवून लावण्यासाठी पुढे आले पाहीजेत.अनेक बुवा बापु आपल्या किर्तनातुन लोकांना सांगत असतात जिथे विज्ञान संपते तिथे आध्यात्माची शक्ती सुरु होते तेंव्हा ही अध्यात्माची शक्ती कुठे गायब झाली...????? या अध्यात्मवाल्यांनी संपूर्ण जगाला दाखवून द्यावे , कोरोनाला रोखण्याची ताकद आमच्या भारतीय चमत्कारात आहे.देवी,देवतां मध्ये आहे.कोरोना रोगाला घाबरण्याचे काही कारण नाही.कोरोना रोग रोखण्यासाठी हे बुवा,बापू पुढे का येत नाहीत..???? अंगात ज्यांच्या येते त्यांनी कोरोनाला रोखून दाखवावे.
कोरोना सारख्या रोगामुळे कोंबड्यांना आज खड्यात गाडले जात आहेत.पाळीव प्राण्यांवर संकट आले आहे.माणसावरच नाहीतर देशाच्या शेअर बाजारावर सुद्धा कोरोनांमुळे प्रचंड घसरण निर्माण झाली आहे.अगौदरच देशाचा विकास मंदावलेला असतांना ,हजारो,लाखो तरुण बेकार झालेले असतांना अचानक आलेला हा कोरोना सामाण्य माणसाला उद्धवस्त केल्याशिवाय राहाणार नाहीत.आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेजारच्या चीनला स्वातंत्र्य मिळाले.मिळालेल्या स्वातंत्र्यात चीनने विज्ञानवादाचा स्विकार केला.देशाला अगदी अल्पावधीत एक विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणले.आम्ही भारतीय मात्र स्वतःच्या भल्यासाठी तरुण पिढीला शाळा,महाविद्यालयातुन अनेक काल्पनिक देव देवतांच्या कथा सांगितल्या.गावोगाव रामायण,महाभारताच्या कथा लावल्या.अखंड हरिनाम सप्ताहात आडकुन पडलो.त्यामुळे भारतात वैज्ञानिकांचा प्रचंड दुष्काळ निर्माण झालेला दिसतो.चीनने अगदी अल्पावधीत कोरोनाचा मृत्युदर रोखला.हे रोखण्यासाठी त्यांनी होम,हवन,यज्ञ,याग केला नाही तर तो विज्ञानाचा आधार घेऊन मिळविला.आम्ही भारतीय मात्र अनेक देवी,देवतांना साकडे घालत आहोत.नवस,सायास करीत आहोत.एवढेच नाहीतर काही महाभाग तर चक्क महायज्ञाचे आयोजन करीत आहेत.अशा लोकांनी खरोखर कोरोना रोखूनच दाखवावे...सामान्य माणसांना फसविण्याचे सर्व धंदे सुरु आहेत.
जगात जेवढे रोग निर्माण झाले  ,त्या रोगांना कोणत्याही देवी,देवतांनी थोपविले नाही तर विज्ञानांनी त्यांचा पराभव केला आहे.पटकी,घटसर्प,देवी,महामारी,महारोग,कुष्टरोग,या सारख्या रोगां पासून मुक्ती विज्ञानानेच केली आहे.तेंव्हा ही सर्व देव,देवता कुठे होत्या,,..????
*या देशात माणसं उपाशी झोपतील भाकरी कोरड्या मिरच्याच्या ठेश्या बरोबर खातील पण दगडाच्या देवावर तेल ओततील दगडाच्या देवाला दुध दहु तूपाच्या अभिषेकाची आवश्यकता नसते दुध,दही,तूप गोर गरीबांना आवश्यक असते ते त्यांना मिळतही नाही ही खरी शोकांतिका आहे*
  *संत गाडगेबाबांनी दुसर्‍या महायूद्धात समुद्रात बुडालेले असंख्य जहाज सोने,चांदी घेऊन बुडालेले होते त्या बुडालेल्या जहाजांना सत्यनारायण घालून वर काढण्याचे आवाहान केले होते.पण कोणीही पुढे आला नाही.आज तसेच आव्हाण करावे लागत आहे.कोणताही बुवा,बापू,यांनी पुढे यावे,वैज्ञानिक आधार न घेता आपल्या चमत्काराने कोरोना थांबवून दाखवावे---- डाॅ.विजय कुमठेकर,जालना मो.9595707056*


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या