- मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी सरकार उदासीन:आ. अभिमन्यू पवार
औसा : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांच्या वॉटरग्रीड प्रकल्पाला मंजूरी दिली होती. यामध्ये लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यतील कामांची निविदा प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना सरकारने या प्रकल्पासाठी केवळ २०० कोटीची तरतूद केली तर मुंबई येथील एका पर्यटनस्थळासाठी १ हजार कोटींची तरतूद केली.मराठवाड्याच्या विकासाबद्दल उदासीन असलेल्या या सरकारने मराठवाडयवर अन्याय केला आहे असा आरोप आ, अभिमन्यू पवार यांनी औसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मतदारसंघातील ८७ प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधल्याचे सांगत कोरोना अफवेने पोल्ट्री उद्योग मोठा अडचणीत सापडला आहे.सरकारने प्रति पक्षी १०० रुपये मदत द्यावी ,अशी मागणी आ.अभिमन्यू पवार यांनी अधिवेशनात केल्याचे सांगत कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात रुग्ण आढळून आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात या आजाराबाबत जनजागृती व दक्षता याबद्दल माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. जनतेने या दरम्यान जत्रा,महोत्सव,समारंभ किंवा अधिक लोक जमतील असे कार्यक्रम घेण्याचे टाळले पाहिजे. याचबरोबर या आजाराबाबत भीती व्यक्त करण्यापेक्षा दक्षता बाळगावी .कसल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये असे सांगून आ. अभिमन्यू पवार म्हणाले की वॉटरग्रीड योजना सुरू झाली तर पश्चिम महाराष्ट्रातील १६८ टीएमसी पाणी मराठवाड्यात येणार आहे. याचबरोबर हा भाग सुजलाम सुफलाम होणार आहे.या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी २० हजार कोटींची तरतूद केली होती .परंतु आघाडी सरकारने अर्थसंकल्पात मराठवाडयच्या पाणी प्रश्नावर उदासीनता दाखवत केवळ २०० कोटींची तरतूद करीत मराठवाडयतील पाणी प्रश्नावर उदासीनता दाखवली आहे.
मराठवाडयतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी १२ धरणे एकमेकांना जोडणार्या महत्वपूर्ण प्रकल्पाला डावलल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगत औसा विधानसभा मतदारसंघासह राज्यातील शेतकरी, शहीद जवान, कुस्तीगीर, होमगार्ड, शिक्षक यांचे प्रश्न विधानसभेत मांडून किल्लारी ३० खेडी पाणीपुरवठा योजनेचे नुतनीकरण, शाश्वत उत्पन्न देणार्या रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी निधी, आशाताई मानधन आदी देण्याची मागणी केली. यातील बहुतांश प्रश्नावर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,औसा नगरपालिका गटनेते सुनील उटगे,सुशीलदादा बाजपाई, ऍड मुक्तेश्वर वाघदरे, ऍड.अरविंद कुलकर्णी, प्रा. भीमाशंकर राचट्टे,फहिम शेख,संजय कुलकर्णी, राजकिरण साठे, तुराब देशमुख, सोनाली गुळबिले आदीसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.