अपंग व वयाचे प्रमाणपत्र वितरणाचे कामकाज १४ एप्रिल पर्यंत बंद

अपंग व वयाचे प्रमाणपत्र वितरणाचे कामकाज 
१४ एप्रिल पर्यंत बंद


लातूर : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व संस्थामध्ये मोठया प्रमाणात जनसमुदाय एकत्र येतील अशा बैठका / कार्यक्रम/ चर्चासत्र / कार्यशाळा / संमेलन / परीषद इत्यादीचे आयोजन करु नये असे कळविले असल्यामुळे तसेच रुग्णालयामध्ये गर्दी होवून नोवेल कोरोना व्हायरसचा प्रसार वाढू नये,खबरदारीचा उपाय म्हणुन   दि. १८ मार्च २०२० ते दि. १४ एप्रिल २०२० या कालावधीत अपंग प्रमाणपत्र, नोंदणी, तपासणी व वयाचे प्रमाणपत्राचे वितरण शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहतील.
        तसेच अपंग व वयाचे प्रमाणपत्र वितरणाचे कामकाज अत्यावश्यक नसल्यामुळे बंद ठेवण्यात येत आहे.  यापूर्वी ज्या अपंग व्यक्तींना तपासणीची पुर्वनियुक्ती दिलेली आहे अशा अपंग व्यक्तींना प्राधान्याने पुर्ननियुक्ती देण्यात येईल्. त्यामुळे सर्व अपंग व्यक्तींनी वरील कालावधीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत येण्याचे टाळावे असे आवाहान अधिष्ठता डॉ. गिरीष ठाकुर यांनी केले आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या