गोमुत्राच्याही पलीकडे ...!
कोरोना या महाभयंकर रोगाने चीनसह संपुर्ण जगभरात हाहाकार माजवला असला तरी त्यावर अजूनही योग्य ती औषधी अथवा संशोधन होऊ शकले नाही परंतू भारत देशात त्यावर औषधी आणि उपाय असल्याचं सांगून गोबर आणि गोमुत्र हे सामान्य लोकांना पिण्यास प्रवृत्त करण्यासाठी मिडीयाला हातशी धरुन खेळ खेळण्याचा प्रकार चाले आहे पण या ’गोमुत्राच्याही पलीकडे’ विज्ञान आणि संशोधन आहे हे विसरून फक्त गाय गोबर यांच्यातच गुंतवण्याचा विडा जणू काही विकृतींनी उचलला आहे असे जाणवते. याविषयी विद्रोही कवी विश्वाभंर वराट म्हणतात की,
’गोमुत्राच्याही पलीकडचे
विज्ञान घ्या हातात
गोभक्तांनो किती दिवस लोळणार
गायीच्या गोमुत्रात ?
जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर्स, संशोधन प्रयत्न करोनावर संशोधन करत असून हा आजार प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे या आजाराबात सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. जगभरातील संशोधक कोरोनावर संशोधन करण्यात गुंतले आहेत मात्र भारत देशातील लोक कोरोनाची खोखला कॉलरट्युन ऐकवण्यात गुंतवून गोमुत्राच्या नादी लावले आहेत. म्हणजेच जे लोक कोणालाही न विचारता जर आमची कॉलरट्यून बदलून खोकला ऐकवू शकतात ते लोक इव्हीएम मशिन्स मधील मतदान बदलू शकत नसतील का ?.
अखिल भारतीय हिंदू महासभेनं गोमूत्र हा कोरोनावरील रामबाण उपाय असल्याचा दावा करून यासाठी गोमूत्र पिण्याच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं हे पोस्टर बघितल्यानंतर ’गोमूत्र कोण पितं हे मला बघायचं आहे’, असं बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा म्हणाल्या होत्या. मात्र, हिंदू महासभेच्या कार्यक्रमात लोकांनी खरंच गोमूत्र पिल्याचं एका व्हिडीओत समोर आलं तो व्हिडीओ पाहून रिचा चढ्ढांना आश्चर्याचा धक्का बसला.
तेव्हा रिचांना सांगावं वाटतं की, नवनाथ रेपे लिखित संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा. एम.एम. लिहीतकर लिहितात की, ’भारत हा मनोरूग्णांचा देश आहे’. तसचे एक वर्षापुर्वी किरण इंगळेंनी फेसबुकर म्हटले की,
’गाईचे वासरू माणसापेक्षा जास्त शहाणे असावं !
कारण मी त्याला दुध सोडून
’गोमुत्र’ पिताना आजपर्यंत तरी बघितले नाही !.
हिंदु हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी हे म्हणतात की, कोरोनावर औषध म्हणून
गोमुत्रासह शेण खा आणि ओम जप करा असे म्हणतात त्या चक्रपाणींच्या हाती शेण व गोमूत्र देऊन चीनला पाठवलं पाहीजे. कारण यांचे नाव जरी चक्रपाणी असले तरी त्यांच्या तोंडातून गोमुत्रवाणी निघताना दिसत आहे. याविषयी विद्रोही कवी विश्वाभंर वराट म्हणतात की,
’पूर्वी निमोनियासाठी
गाढवीच्या दुधाचा वापर होत होता म्हणे
मग आता म्हणाल का गाढवीला माता अन् पिता ?
आमच्या देशात छप्पन इंचाची छाती घेऊन फिरणारे मान्यवर असतानाही काही महाशय कोरोना ला भिताना दिसतात त्यामुळे तर ’कोरोना संसर्ग संपेपर्यंत पर्यटकांनी राळेगणसिद्धीस न येण्याचं आवाहन अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे केलं आहे. तेव्हा आण्णांना विचाराव वाटतं की, छप्पन इंचाची भाषा करणारे कोरोनाच्या एका किटाणूला एक इंच तरी मागे हटवतील का ? तसेच मनोहर भिडेंचा आंबा जर पुत्रप्राप्तीसाठी तो गुणकारी असेल तर कोरोनावरील उपचारासाठी चालत का नाही ? आण्णा हजारे यांचे जूने सहकारी रामदेव बाबा हे पंतजली गोधन अर्क या नावाची बॉटल चक्क ९० रुपयांना विकतात त्या गोमुत्रावर अण्णांचा विश्वास नाही का ? म्हणजेच आण्णांचा गोमुत्रावर विश्वास नाही म्हणून तर त्यांनी लोकांना न येण्याचं आवाहन केलं ?. तसेच गायीच्या शेणा गोमुत्रावर संघाचाही विश्वास नाही म्हणून तर कोरोनाच्या भीतीने संघाची बंगलोर येथे होणारी बैठक रद्द केली हे आमच्या बहुजन समाजाने समजून घेतलं पाहिजे.
गावागावात हातात धोपटी घेऊन केवळ १०१ रुपयामध्ये शनि राहू अन् मंगळाची पीडा आणि दिशा बदलून देणारे पांचागधारी पंडित मग कोरोना या व्हायरसची दिशा बदलू का शकत नाहीत ?, एखाद्याच्या घरातील व्यक्तीला समजा काळजी घेऊनही कोरोना रोगाची लागण झालीच तर त्या रूग्णाला ’थरथरणा-या हाताने चहा दिल्यास आणि त्याने तो पिल्यास कोरोनाग्रस्त रूग्ण बरा होईल का ? यांचं स्षटीकरण थरथरणा-या हाताचा सिध्दांत मांडाणा-या अपर्णाताई रामतिर्थकर देतील का ?.
२६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्यावेळी एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले पण साध्वी प्रज्ञासिह म्हणतात की, माझ्या शापाने करकरे मरण पावले तर मग त्या साध्वींजी कोरोनाचा विषाणू का मारत नाहीत ? तसेच औरंगाबादचे खासदार म्हणतात की, प्रमोद महाजन यांना भस्म लावले असते तर ते परत जिवंत झाले असते. मग ते माजी खासदार कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीला भस्म लावून जिवंत करतील का ?. नाही कारण आता आमच्या लोकांनी साध्वींचा शाप आणि खैरेंचे भस्म समजून घेऊन लोकांना खरे काय ते सांगितले पाहिजे.
देव तारी त्याला कोण मारी असं ऐकलं होतं पण आज तर देशभरातील सर्व मंदिरांना टाळे लावून मुर्ती व पुजा-यांनीच मास्क लावले. मग आता लोकांना तारणार तरी कोण ? देव तारी त्यालाही कोरोनाच मारी असं म्हणावे का ?, काही महाशय तर म्हणत होते की, ’जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं’ असं म्हणून कोकलणारे आज विज्ञानाच्या सहाय्याने बनवलेले मास्क घालून दडून बसले आहेत. तेव्हा त्यांना सांगावं वाटतं की,
जिथे अध्यात्म संपते, तिथे मंदिर, मस्जिद, चर्च यांची दारे बंद करून दवाखान्यांची दारे उघडावी लागतात. याविषयी विद्रोही कवी विश्वाभंर वराट म्हणतात की,
’अंधभक्तांनो आमचे विज्ञानवादी विचार पटले तर बघा
नाहीतर चहा अन् दुधा ऐवजी गोमुत्राच पित बस्सा !’
कोरोनाही भक्तांना म्हणत असेल की, तेरे पास क्या हैं ? त्यावर भक्तही म्हणत असतील की, हमारे पास ५६ इंच छाती, भस्म-जप-मंत्र, गाय-गो(बर)मुत्र, कांदा लसूण सब कुछ हैं, लेकिन दिमाग नहीं हैं इसिलीए तो दुध ४० रुपये और गोमुत्र ९० रुपये लिटर खरीद रहे हैं !.
आता आमच्या बहुजन समाजाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोबर गोमुत्र यांचे सेवन न करता डॉक्टरच्या सल्ल्याने आरोग्याची काळजी घेऊन सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे व त्यांचे भविष्यातील धोके समजून सांगण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. कारण कोरोनाने घरात कुजून मरण्यापेक्षा लोकांच्या मनातील अंधश्रद्धा काढून सीएए, एनआरसी, एनपीआर ची माहीती सांगत सांगत मेलेलं कितीही चांगल.
’कोरोना के नाम से गोबर गोमुत्र तो सिर्फ एक बहाना है !
सीएए, एनआरसी, एनपीआर और इव्हीएम को दबाना है !’
रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२