नगराध्यक्ष सहाल चाऊसांचा जामीन अर्ज फेटाळला
- माजलगाव/(प्रतिनिधी) : येथील नगर परिषदेत अपहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस व लेखापाल अशोक कुलकर्णी यांचा जामीन १८मार्च बुधवार रोजी माजलगाव अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी फेटाळून लावला आहे.
नगर परिषदेच्या १कोटी,४१लाख रुपयांचा अपहार प्रकरणात नगराध्यक्ष चाऊस यांना ४ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी वांगीकर हे दोघे स्वतः पोलिसांकडे हजर झाले होते.या तिघांनाही येथील न्यायालयाने ६मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.त्यानंतर चाऊस व मुख्याधिकारी येलगट्टे यांची ११पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. ११मार्चला मुख्याधिकारी येलगट्टे यांची सुटका झाली तर चाऊस व कुलकर्णी यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.यावर चाऊस यांच्या वकिलांनी जामीन मिळावी म्हणून माजलगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.त्यावर बुधवारी ११ वाजता सुनावणी होऊन न्यायदंडाधिकारी एस.पी.देशमुख यांनी हा अर्ज फेटाळून लावला.यावेळी चाऊसांच्या वतीने उच्च न्यायालय औरंगाबाद,खंड पिठातील विधिज्ञ गंगाखेडकर यांनी तर सरकारी पक्षाच्या वतीने रणजित ए.वाघमारे यांनी बाजु मांडली.