लातूर जिल्हा गौण खनिज खाते हे वाळू माफियाकडून काय खाते
देवणी (ला.प्र.प्र)लातूर जिल्ह्यात वाळूमाफियांचे जाळे पसरले असून, देवणी तालुक्यातील धनेगाव, माटेगडी, इसाबनगर, शिरूर गिरकचाळ, देवणी तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. दिवसा माती वाहतूक होते आणि रात्रीला अवैंरित्या वाळू वाहतूक होतो. तहसीलदार देवणी, मंडळाधिकारी, तलाठी, पोलीस प्रशासन, गौणखनिज विभाग, या सर्वांची मिलीभगत आहे. गौण खनिज विभाग निष्क्रिय असल्याकारणाने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडला जातो आहे. देवणी तालुक्यांमध्ये अनेक वर्षापासून या भागातील वाळू माफियाकडून अवैधरित्या परवानगी न घेता वाळू उपसा केला जातो. याकडे या भागातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, यांना भरमसाठ चिरिमिरी देऊन वाळू अवैधरीत्या वाहतूक होत असते अशी चर्चा असली तरी या भागातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, यांनी वारंवार महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, यांच्या निदर्शनास आणून देवून देखील चिरीमिरी घेऊन वाळू माफिया कडून लाखो रुपयांचा महसूल मातीत घालण्याचा या देवणी तालुक्यातील महसूल विभाग करीत आहे. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांनी अनेक स्वरुपाचे आंदोलन केले. आंदोलनाला विरोध म्हणून वाळूमाफियांनी त्यांच्यावर जीवघेणे हल्ला केला. परंतु गौण खनिज जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वाळू माफिया या भागातला कोण आहे, तो काय करतो, त्याला कोणाचं सहकार्य आहे,अशी उलटसुटल चर्चा असली तरी राजकीय, पोलीस प्रशासनाचे, महसूल विभागाचे, या सर्वांचे सहकार्य आहे हे सर्वांना माहीत आहे, विभागीय आयुक्त औरंगाबाद कर्तव्यदक्ष आहेत असे ऐकून आहे. परंतु ते देखील डोळेझाक करतात हे दिसून आले आहे. पत्रकार अशा घटना नेहमी वृत्तपत्रातून छापून प्रकाशीत करत असतात. वृत्तपत्रातील बातमी वाचून जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते करोडो रुपयांचा महसूल बुडविला जातो याकडे प्रशासन दुर्लक्ष करते ही बाब गंभीर असल्याचे नागरीकातून बोलले जाते. जिल्ह्यातील गौण खनिज, महसूल वाचवण्यासाठी कोण पुढाकार घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रात्रीच्या वेळी १०० १०० हॅवा गाड्या वाळू अवैधरित्या वाहतूक करतात ही बाब पोलीस प्रशासन, महसूल विभाग यांना ज्ञात असतानादेखील गौण खनिज चोरीला जातो. गौण खनिज खाते हे खातच राहते की काय अशीच देवणी तालुक्यात चविने उलटसूलट चर्चा होत असून, लातूर जिल्हा प्रशासन व विभागीय आयूक्त औरंगाबाद काय कार्यवाही करील याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.