विना शुल्क धान्य मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानदारास न्यायाधीश शेख यांच्या हस्ते धनादेश

 विना शुल्क धान्य मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानदारास न्यायाधीश शेख यांच्या हस्ते धनादेश 


भोकर तालुका मराठी पत्रकार संघ व नागवंश कर्मचारी मित्रमंडळाचा आगळावेगळा उपक्रम


 



भोकर/(सिद्धार्थ जाधव) : अज्ञानाच्या, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या दीनदुबळ्यांच्या हितासाठी, त्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभे आयुष्य झिजले. सुखदुःखाच्या काळी एकमेकांना मदतीचा हात पुढे करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय मौल्यवान संदेश डोळ्यासमोर ठेवत भोकर तालुका पत्रकार संघ व नागवंश कर्मचारी मित्रमंडळाच्या वतीने १४एप्रिल २०२० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त कोरोना माहामरीच्या संकटामुळे होम लॉकडाउण झालेल्या हातावर पोट असलेल्या मौजे नारवाट  येथील बहुरुपी समाज  कुटुंबियांना भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मा. मुजीब एम शेख व पीएस आय अनिल कांबळे यांच्या हस्ते अन्न किट पॉकिट व धान्यदान तसेच मौजे देवठाना येथील नाथजोगी भिक्षुक बांधव  व भोकर शहरातील हनुमान नगर, शेख फरीद नगर मधील गरिबांना अन्नदान करून करून भीम जयंती साजरी करून महामानवास आगळेवेगळे  अभिवादन केले.
   देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू आहे. महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातही या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे .त्यामुळे गोरगरिबांच्या हाताला काम उरले नाही. 
  एरवी पोलीस वेशात फिरुन आणि गीते गाऊन पारंपारीक कलेच्या बळावर भिक्षा मागून आपली उपजीविका भागवीणारे  भोकर तालुक्यातील मौ.नारवट येथील बहुरुपी समाजातील ५० कुटूंबांतील २८० सदस्यांनी  शासनाच्या आदेशांचे पालन करत स्वत:सह आपल्या कुटुंबाचे पोट   लॉकडाऊन केले आहे.परंतू आपल्या कलेतून इतरांच्या चेह-यावर हसू व आनंद पाहणारे हे लोक या बिकट परिस्थितीतही कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळा व जत्रेत कोणीही जायचं नाही (गर्दीत) आता भिक्षा मागायची नाही असे सांगत आहेत आणि आपल्या कलेच्या माध्यमातून  गीत म्हणत समुपदेशन करत आहेत ... नको आता लगीन नको आता जतरा,कोरोनाचा आहे बंधू  लई भारी खतरा...! अशा पद्धतीने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना प्रादुर्भाव संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या नियमांची अमलबजावणी करत उपरोक्त महत्वपुर्ण हा संदेश ते देत आहेत.पोलीसांचा वेश परिधान करुन व त्यांच्या भाषेत बोलून मनोरंजनाने इतरांच्या चेह-यावर हसू आणणारे व भावगीते,भक्तीगीते,महापुरुषांचे जीवन गौरव गीते गाऊन अनेकांना आनंद प्राप्त करुन देणारे हे बहुरुपी समाज बांधव दात्यांकडून मिळेल ती भिक्षा घेऊन आपल्या कुटूंबीयांची उपजीविका भागवितात.यामुळे या कलेच्या बळावरच मिळेल त्या भिक्षेत जगण्या शिवाय यांच्यापुढे अन्य पर्याय नाही.आणि अशातच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगात थैमान घातले आहे.या संसर्ग बाधेच्या विळख्यात देश व आपले राज्य ही अडकले आहे.
    शासनाचे स्वस्त धान्य व मोफत तांदुळ यांना मिळत आहेत. परंतू केवळ या धान्यांने पोटाची भुक भागत नाही.तर त्या सोबत तेल,मीठ,तिखट,साखर आदी काही लागते.याचं काय करायचे ? हा प्रश्न उभा राहतोच.म्हणून चार पैशाची बचत व्हावी व त्या पैशातून या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात.या उदात्त हेतुने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाने स्वस्त धान्य दुकानामार्फत त्यांना मिळणारे मे महिन्याचे हे धान्य विना शुल्क मिळावे यासाठी त्या ५० कुटूंबीयांच्या धान्य शुल्काची एकूण रक्कम दुकानदारास देण्याचा निर्णय घेतला आणि दि.१४ एप्रिल २०२० रोजी वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या मंगलमय औचित्याने त्या रक्कमेचा धनादेश जिल्हा न्यायाधीश मा.मुजीब एस.शेख यांच्या हस्ते दुकानदाराकडे सुपूर्द करण्यात आला.
    तसेच भोकर तालुका मराठी पत्रकार संघ व नागवंश कर्मचारी मित्र मंडळ भोकर यांच्या वतीने भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मा.मुजीब एस.शेख, पो.उप. नि.अनिल कांबळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,सचिव सिद्धार्थ जाधव व सर्व पदाधिकारी,नागवंश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते अन्न दान करण्यात आले.तसेच मौ.देवठाणा येथील नाथजोगी व भोकर शहरातीलभोकर शहरातील हनुमान नगर, शेख फरीद नगर मधील गरिब, गरजू,निर्वासित अशा ७५० गरजूंना अन्न दान करण्यात येऊन या आगळ्या वेगळ्या उपक्रमानातून अभिवादनाने महामानवाची जयंती साजरी करण्यात आली.
    या आगळ्यावेगळ्या कौतुकास्पद अभिनव उपक्रमात तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव सिद्धार्थ जाधव बी.एस.सरोदे प्रा.आर.के.कदम सुधांशू कांबळे, गंगाधर पडवळे,संदेश कांबळे,शेख एस कुरेशी,शेख लतीफ, शेख फहीम,अरुण डोईफोडे,शेख शाहरुख,मौलाना सुजाउद्दिन,चंद्रकांत बाबळे,सहशिक्षक जे.डी.वाघमारे, असलम शेठ आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.तर पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व नागवंश शिक्षक कर्मचारी मित्रमंडळाचे सहशिक्षक दत्तात्रय सोनकांबळे,आर.के.कदम ,गौतम कावळे ,प्रकाश वाघमारे,संजय जळपतराव, यासह आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
भोकर शहरात स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्ते, दानशूर अशा प्रकारे आदीजण अन्न व धान्य वाटपाचे काम मोठ्या प्रमाणात करत आहेत.परंतू ग्रामीण भागात देखील हातावर पोट असलेल्या व उपासमार होत असलेले उपरोक्तां सारखे अनेकजण आहेत.म्हणून यांच्या मदतीसाठी ही काही दानशूरांचे हात पुढे येण्याची नितांत गरज आहे.अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या