मर्यादेपेक्षा जास्त काळ जनतेला डांबणे अंगलट..

मर्यादेपेक्षा जास्त काळ जनतेला डांबणे अंगलट..


मुंबई (लातूर प्रभात प्र.) ः प्राणघातकी कोविड १९ हा संसर्गजन्य रोगाने देशाला नाकीनऊ आणून सोडले आहे.  त्यात दिल्ली, मुंबई, पुणे, यासह देशभरातील अनेक राज्यात या महामारी रोगाने उच्छांद तोडला आहे.  वेळीच उपचार व रोगाचीच नाकेबंदी केली असती तर आज कोरोना कोरोना म्हणून जीवमूठीत घेवून जगण्याची वेळ आली नसती अशीच चर्चा होताना दिसते आहे. 
 जर्मनीसारख्या देशाने तात्काळ संशोधन, औषध निर्मिती व विनाविलंब उपचार या कोरोना हद्दपार झाला. अशीच कृती भारत सरकारने केली असती तर ही वेळ आली नसती कारण संसर्ग जन्य विषारी विषाणू असलेला कोरोना देशभर पसरतो आणी दिल्ली येथे मरकज मेळाव्यास परवानगी देण्यात येते.  हीच मोठी चूक आणी कोरोनाच्या फैलावास कारणीभूत असून जनतने लॉकडाउन नाकरला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती अशी चर्चा होताना दिसते आहे. 
 मुंबई पुणे येथे कोरोनाचे प्रमाण अधिक असले तरी बाधक रुग्ण व मृताची संख्या कमी आहे.  भारतातील परिस्थिती तशीच आहे.  पंरतू जनतेनेच संचारबंदी लागू करुन घेतली लॉकडाउन स्विकारले आता पुन्हा तेच ते शासन करणार असेल तर मर्यादेपक्षा जनतेला जास्त काळ डांबणे हे अंगलट येईल त्यासाठी युध्दपातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन उपचार करणे शिवाय पर्याय नाही अशी चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या