मानवी क्षमतेला आव्हान देणारा कोरोना

संपादकीय...


मानवी क्षमतेला आव्हान देणारा कोरोना


 अख्ख्या मानवजातीला मृत्यूप्राय आव्हान देवून स्वतःचे वर्चस्व गाजविणार्‍या कोरोना कोविड १९ या संसर्गजन्य रोगाने जगभरातील जनतेसह भारतीय नागरीकाना जखडून ठेवले आहे.  हा विषारी रोग हा  मानव निर्मित नसून तो निसर्गदत्तच असावा या संदेह नसावा.  संवेदनशिल, भावनीक, आशादायी मानवाची चेष्ठा करुन पाहणार्‍या गर्वीस्ट, सत्ताधिश माणसाची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठीच कोरोना या विषारी संसर्गजन्य रोगाने उग्र रुप धारण करुन मानवी क्षमतेचा अंदाज घेण्याचे ठरविले असावे म्हणून भारतासंह सर्व जगालाच या रोगाने वेढून टाकल्याने आमजनतेची सत्वपरिक्षा या रोगातील विषारी जंतू घेताना दिसत असले तरी भारतीय नागरीक, येथील शासन, स्थानीक प्रशासन, पोलीस यंत्रणा लोकप्रतिनिधी युध्दपातळीवर सामना करीत असताना दिसत आहेत.  हे ही नसे थोडके असेच म्हणावे लागेल. 
 भारतीय महिला, पुरुष, तरुण, तरुणी एकदिलाने, धैर्याने शिस्त व संयमाने कोरोनाशी मुकाबला करीत असले तरी या जीवघेण्या परिक्षेत माणूस पास होतो की नापास हा निकाल मात्र कोरोनाचे विष आणी माणसातली प्रतिकार क्षमतेवर अवलंबून असल्याने केवळ डॉक्टरी उपचार व त्याना लाभत असलेले जनतेचे सहकार्य यावरच कोरोनाचा कोलाहल परतवू शकतो कारण करोना कोविड १९ ने जाळे दुरवर आणी खोलवर रुजविले असल्यामूळे त्याचा विमोड करणेपलिकडे दुसरा पर्यायच नाही अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.  ती अव्हेरुन चालणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
 कोरोना विषारी जंतूचा आवाका एवढा भयग्रस्त आहे की तो सरळ र्‍हदयकोषातच शिरकाव करुन बाधीत रुग्णाला व्याकूळ करुन सोडतो.  त्यावर वैद्यकीय उपचाराचेच परिमाण लागू पडते अंधश्रध्दाळू भावना किंवा देवपूजा इथं निष्क्रीय ठरते फक्त मनोबल व आरोग्य सुविधाच पर्यायी ठरु शकतात हेच प्रमाण ठरते.  आणी येथेच आपल्या सहनशिलतेचा अंदाज येवून कोविड १९ या विषारी जंतूचा पाडाव करण्यास आपण सक्षम ठरतो यात संदेह नसावा आणी नाहीच पंरतू मानवी क्षमतेला आव्हान देणार्‍या कोरोनाचे समूळ उच्चाटन, निर्मूलन करणे यापलीकडे दुसरे, तिसरे हाती कांहीच नसल्याने हतबलता येता कामा नये हाच उपाय म्हणून जनतेने जागृत राहून टाळेबंदीचा निर्यायक स्किार हाच एक विकल्प समोर असताना दिसतो आहे त्याचे पालन करणे काळाची गरज वाटते. कोरोना रोगाच्या धास्तीने आजघडीला मानवी मनाची कशी दयणीय अवस्था झाली आहे की, आज पाहिले मरण, गेला भांबाहून प्राण, गेले माझ्या ज्ञानाचे कूंपन स्मशानात, असे का होते आपल्यातला दांभीकपणा, निष्काळजी पण त्याला साथ सरकारी निष्क्रीयतेची म्हणून असे अवचित अगतीक घडत असावे अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 
 महाकाय प्राणवेचक कोविड १९ या विषारी रोगाच्या भितीपोटी व या रोगाचे निर्मूलन व्हावे म्हणून लोकांच्या सहमती व सहकार्यातूनच केंद्र व राज्य सरकारानी प्रथमतः जनता संचारबंदी लागू केली तद्नंतर लॉकडाउन केले.  त्यातही कोराचा परतावा होवू शकला नाही.  उलट शिरकाव होत आहे म्हणूनच पून्हा टाळेबंदीची मूद्दत वाढवावी लागते आहे.  यामूळे ज्या संसदभवन, विधानभवनासह रेल्वे स्थानके, बस स्थानके, व उद्योग व्यवसाय, मिल, कारखान्यात दिसणारी मानवीगीरी ओसरली असून त्याठिकाणी मोर, हरणे जनावरचा मुक्त संचार विहार होताना दिसतो आहे.  ही बाब मानवीप्रकृतीला सोसणारी नसावी अशीच भिती व्यक्त होताना दिसते आहे.
 एकंदरीत मानवी क्षमतेला आव्हान देणारा कोरोना संसर्गजन्य रोग आणी या रोगामूळेच भारतीय नागरीकाना गमवावे लागणारे प्राण आणी त्यातून निर्माण होणारे मृत्यूचे तांडव या सार्‍या घडणार्‍या बाबी मानवी मताचे खच्चीकरण करणार्‍याच असल्याने धैर्य, संयम, जिद्द आणी शिस्तच आपणास आधार व धीर देवू शकते यातूनच कोरोनाचा मुकाबला व लॉकडाउनचे पालन हाच एक विकल्प आपणा सर्वासमोर असून समर्थपणे निर्धाराने सज्ज राहून कोविड १९ या विषारी जंतूचा नायनाट करणे साठी आरोग्यविभाग, स्थानीक प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे काळाची गरज असून ती आचराणात आणणे हेच कर्तव्य ठरते हेच वास्तव आहे.  असावे यात दुमत असू नये एवढेच वाटते.  म्हणूनच जनतेसह सत्ताधारी लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने एकदिलाने सहमती व सहकार्यातून कोरोना विरुध्दची लढाई जिंकावी अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.  ती सार्थ ठरावी अशीच अपेक्षा मानवी समुहातून प्रतित होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या