कौटूंबिक पध्दतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी
उदगीर : उदगीर येथील ’अस्मिता निवास’देगलूर रोड येथे कौंटुबिंक पध्दतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नरसिंग उदगीरकर हे उपस्थित होते. विचारमंचावर डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, कार्यक्रमाचे संयोजक युवाउद्योजक योगेश उदगीरकर उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवाउद्योजक योगेश उदगीरकर म्हणाले की,सध्या जगात कोरोना सारख्या रोगानी थैमान घातले आहे.शहर लॉंकडाऊन आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक घरातील व्यक्तीमध्ये एक मीटर अंतर ठेवून महात्मा फुले विषयी क्रतज्ञभावना व्यक्त करावी या हेतूने अभिवादन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे म्हणाले की, अशा ही आवस्थेत महात्मा फुलेंची जयंती करणे आपल्या कुटुंबातील व्यक्तीने कर्तव्य मानले. आमच्या घराच्या स्त्रिया शिकल्या ,षुरूष शिकले आणि स्वाभीमानाने जगत आहेत याचे श्रेय महात्मा फुलेकडे जाते. कर्तव्याची,उपकाराची,आणि जबाबदारीची जाणीव असणे म्हणजे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचाराचे स्मरण असते.शिक्षण हेच सार्वागिंण प्रगतीचे माध्यम आहे.महात्मा फुलेंनी शिक्षण हे मानवाला तिसरा डोळा दिला त्यांनी केलेले कार्य समग्र मानवासाठी उपकारक आहेत असे विचार यावेळी त्यांने मांडले. अध्यक्षीय समारोप करताना नरसिंगराव उदगीरकर यांनी आपल्या कुटुंबालातील सर्व सदस्यांना महात्मा फुले यांचे जीवन आणि कार्याची माहिती दिली. महात्मा फुले हे समाजशिक्षक होते बहुजनांना,समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.वेगवेगळ्या ग्रंथाचे लेखन करून समाजप्रबोधन केले.महात्मा फुले हे संवेदनशील मनाचे महापुरुष होते.अनाथाचे नाथ म्हणजे महात्मा फुले होते.त्यांचे कार्य आणि विचार नवीन पिढीला प्रेरणादायी आहे.
यावेळी मराठी सिने अभिनेत्री भाग्यश्री उदगीरकर, धनश्री उदगीरकर यांनी महात्मा फुलेंच्या जीवन कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार अस्मिता चिमोरे हिने केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश उदगीरकर, वैभव सूर्यवंशी, आशय चिमोरे यांनी परिश्रम घेतले.