भंगार झोळीचे निर्मूलन झाले अन् हाती भिक्षापात्र आले

भंगार झोळीचे निर्मूलन झाले अन् हाती भिक्षापात्र आले


नागपूर (लातूर प्रभात प्र.) ः हावळ हाय की गड्ड्याची बिमारी हाय ते माहित नाय पर कोरुना, करोना कोवीड कवीळ अस कायतर देशावर आलं आणीक महाराष्ट्रालाही घेरलं असा बोलबाला सुरु झाला आणीक नागपूरात ही कोरोना, आलाय, घरबंदी झालीय अशी बतावणी सुरु झाली.  भल्यापहाटे उठून शताब्दी चौक, रहाटे नगर, टोली वस्ती व रस्त्यावरील प्लास्टीक, पन्नी बाटल्या भंगार वेचून उदरनिर्वाह करणार्‍या रेश्या शिंदे हिने टाळेबंदी मूळे उपासमारी आणी घरात अडकून बसण्याची वेळ आली अशी व्यथा दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीजवळ सांगत होती.
 भंगार गोळा करुन लेकरं बाळं सांभाळली पण कोणासमोर हात पसरला नाही.पण हा रोग त्यात टाळेबंदी आल्याने भुक, भुक म्हणून रडणार्‍या बाळाकडे पाहावत नाही. म्हणून कडेवर, खांद्यावर लेकर घेवून भिक मागून गुजरान करतेया.  सरकार फुकटचं धान देतय मन पर आमच्यापरत आलच नाय, पंरतू भंगाराची झोळी गेली आणी हाती भिक्षापात्र आहे हे मात्र आम्ही विसरु शकत नाही.  असे ही रेश्मा बाईने सांगायला विसरले नाही. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या