लोकप्रतिनिधीना अशावेळी निष्ठावंत कार्यकर्त्याचा विसर कसा

लोकप्रतिनिधीना अशावेळी निष्ठावंत कार्यकर्त्याचा विसर कसा


मुंबई (लातूर प्रभात प्र.) ः महाराष्ट्र ही साधू संताची भुमी, धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचाराचा वारसा आणी फुले, शाहू, डॉ. आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाची कर्मभूमी अशी ओळख असलेला महाराष्ट्र, स्वार्थी व मतलबी समाजकारण, राजकाराने काळवंडलेला दिसतो आहे.  कारण लोकानी-लोकासाठी चालविणारे राज्य म्हणजेच तोच लोकशाही राज्याचा मुख्य पाया असतो हे ब्रिदवाक्य भारतासाठी न्यायीक वाटते. महाराष्ट्रासह भारतातील लोकप्रतिनिधी हे जनतेने दिलेल्या मतदानातूनच निवडून येत असतात ते विजयी उमेदवार लोकसभा-विधानसभेत जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवेचे काम करीत असतात.  त्यांचा मुळ दुवा हा कार्यकर्ता असतो.  ऐन निवडणूकीच्या वेळी स्वतःसह घरादाराची काळजी न करता आपल्या उमेदवाराचा हा पक्ष आहे, त्यांचे निवडणूक चिन्ह हे आहे, त्यानाच निवडून द्यावे, जाणकार, कर्तबगार आहेत म्हणून मतदाराना विनवणी करुन आपल्या लाडक्या उमेदवाराला विजयी करुन मुंबई, दिल्लीला पाठवितात. आणी लोकप्रतिनिधी बनलेला हा कर्तव्यदक्ष न्यायीक माणूसच मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करुन गिधाड बनून लचके तोडत बसतो, अशीच अवस्था त्याच्या कार्यपध्दतीवरुन स्पष्ट होताना दिसते आहे.  यात सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी सामील आहेत याची साक्ष देण्याची गरजच नाही, अशी आमजनतेतून चर्चा होताना दिसते आहे. 
 आजघडीला कोरोना रोगाच्या शिरकाव्यामूळे लॉकडाउन लागू झाले आहे.  यात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता घुसमटून जाते आहे.  विजयी झालेले लोकप्रतिनिधी थाटात गाठीभेटी घेवून कोरोनाग्रस्ताना मदत करुन तशा बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द करुन स्वतःची प्रसिध्दी करवून घेताना दिसत आहेत.  पण ज्यानी अहोरात्र कष्ट करुन प्रचार, प्रसार करुन विजय मिळवून दिला ते आज लॉकडाउन मध्ये कसे जगत असतील याचा विचार नाही की त्याची भेट घेणे गरजेचे नसावे अशीच स्थिती लोकप्रतिनिधीची झाली असावी अशा या लोकप्रतिनिधीचे तूलना भिकार्‍यापलिकडे करणे ही चुकीचे वाटते कारण मतदार संघातील मदतीचा आव आणून स्वतःच्या प्रसिध्दीसाठी शासनाकडे मदतीचा हात पुढे करीत ओत पण निष्ठावंत कार्यकर्त्याना वार्‍यावर सोडून हित जोपासणार काय अशीच संतापजनक चर्चा होताना दिसते आहे. 
 विशेष म्हणजे कोरोना निर्मूलनासाठी लातूर, महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन असल्याने शासनासह कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी भाजपाही जिवनावश्यक वस्तूचे किट्स-पिशवी मदत म्हणून वाटप करीत आहेत पण कोणाच्या, कोणत्या पक्षाच्या, शासनाच्या अन्न धान्य किटच्या पिशवीकडे हात पुढे करावी आणी ती स्विकारावी यासाठीचा निष्ठावंत कार्यकर्त्याचा होणारा कोंडमारा, त्यांचे बेहाल होण्यास लोकप्रतिनिधीस असावेत, आहेत यात दूम नसावे अशीच चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या