सरकारी आदेश व सुचना देण्यात राज्य सरकार गर्क, तर भाजपा जिवनावश्यक वस्तु पुरविण्यात व्यस्त
मुुंबई (लातूर प्रभात प्र.) ः महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार कार्यरत आहे. कसेबसे ते कार्यरत असतानाच महाराष्ट्रावर विषारी कोरोना रोगाने कब्जा मिळविला. महाराष्ट्रातील कमकुवत नागरीकांच्या शरीरात पसरुन त्याने अनेक नागरीकावर कब्जा केला. अशा या प्राणघातक रोगावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत करीत आम जनतेच्या समस्या आणि जिवनावश्यक वस्तु, धान्य, पुरविण्याऐवजी केवळ महाराष्ट्र शासन हे सरकारी आदेश व सुचना देवून त्या सुचना व आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कारवाईची भिती घालून कोरोना मुक्तीसाठी कोरडा लढा देत आहे. याउलट केंद्र शासन व भाजपा नेतृत्वाच्या सुचनेनुसार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचेसह सर्वच लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते गरजू व्यक्ती, गोरगरीब जनता कामगार, कष्टकरी मजूरांना जिवनावश्यक वस्तू, अन्न धान्यासह आरोग्य विषयक प्रसाधने पुरवठा करण्यातच व्यवस्त असल्यामूळे सरकार पेक्षा भाजपाच्या सेवाभावी वृत्तीचीच सर्वसामान्य जनतेतून चर्चा होताना दिसते आहे. संचार बंदी आणि लॉकडाउनमुळे गरीब, मजूर, लोकाबरोबरच मध्यवर्गीय जनतेचे व पत्रकारांचे ही बेहाल होत असून अनेकांच्या घरात कमविती व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे चार, पाच असल्याने हाताला काम नाही, दाम कोठून येणार अशा परिस्थितीत गरीब मजूरांचे लॉकडाउनमुळे बेहाल तर त्याचनुसार पत्रकारांचेही नकळत बेहाल होताना दिसत आहेत. मधल्याकाळात वृत्तपत्र बंदी, तर वृत्तपत्र चालू असून ही, जाहिरातीवर बंदी आल्यामूळे वृत्तपत्रे कशी चालवावीत हा प्रश्न भेडसावीत असून लॉकडाउनमुळे वृत्तांकन करण्यासाठी ही पत्रकाराना मज्जाव असल्याने लोकशाहीत ही हुकूमशाही वृत्तीतच जगावे लागत असल्याने पत्रकारानाही मजूरा प्रमाणेच संकटाना तोंड द्यावे लागते आहे, अशी चर्चा होत असून नागरीकांना काम व त्यांच्या सुविधा पुरविण्याची जवाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविली असली तरी योजना राबविणारे अनेक अधिकारी भ्रष्टाचारी असल्याने तसे अधिकारी कोरोना प्रतिबंधात्मक कोणत्या योजनेत टक्केवारी मिळेल अशा योजनेकडेच त्यांचे लक्ष असल्याने उपाययोजनाविनाच कामगार मजूरावर उपासमारीची वेळ आली असून कामगारांचे बेहाल होत आहेत, तर जाणकार लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्यांचे पत्रकाराकडे दुर्लक्ष लक्ष होत असून अशा या गर्देत सापडलेल्या मजूर व कामगारांना बेहालीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामूळे कॉंग्रेस, रॉका, सेने पेक्षा भाजपाच बरी होती काय अशीच दबक्या आवाजात लोकभावनेतून कुजबूज होताना दिसते आहे. त्यात सरकारी आदेश व सुचनातच गरीब जनतेसह मजूर व पत्रकारासह मध्यमवर्गीय जनता ही टाळेबंदीत गुदमरते की काय, अशीच भिती व्यक्त होताना दिसते आहे. यावर शासकीय उपाय योजना राबतील काय, किंवा भाजपाचेच कार्यकर्ते लोकप्रतिनिधी अशा समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी पुढे सरसावतील अशी ही अपेक्षा लोकातून व्यक्त होताना दिसते आहे.