तेलंगानातुन महाराष्ट्रात विनाकारण येणार्या वाहनास प्रवेश बंदी-पीएसआय अनिल कांबळे
भोकर/(सिद्धार्थ जाधव) : कोरोना विषाणूमुळे होत असलेल्या महामारी संदर्भाने व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तेलंगणा महाराष्ट्र सीमा सील केली आहे. तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले तेथील कामगार छुप्या रस्त्याने सीमा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश करू नये म्हणून प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे हे पाहण्यासाठी गेलो असतांना यावेळी माहिती देतांना पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे म्हणाले की नांदेड जिल्ह्यात एकही कोरेनाचा रुग्ण सापडला नसल्यामुळे तरिही आनंदित न होता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व भोकरचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे सिमा बंदीकेली असून केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहन ज्यामध्ये भाजीपाला, किराणा, साहित्य फळे अशा परवानाधारक वाहनलाच आम्ही रीतसर तपासणी करून महाराष्ट्रात प्रवेश देत आहोत आणि विनाकारण काहीही कारणे सांगून प्रवेशाची मागणी करणार्याला आम्ही तेथूनच माघारी पाठवून देत आहोत व तसेच तेलंगणातून महाराष्ट्रात येणारे लहान मोठे सर्व मार्ग सील बंद केले असून तेलंगणा जवळील गावे मौजे आमठाणा,किनी,पाळज, दिवशी,लगळुद, येथील पोलीस पाटील व गावकर्यांना निर्देशीत केल्याने गावकर्यांनी सुद्धा कठोर मेहनत घेत कोणालाही तेलंगणा येथून महाराष्ट्रात प्रवेश करू न देण्याचं कार्य सुरु केले असून ते नजर ठेवूनच आहेत म्हणुन तेलंगणा महाराष्ट्र सीमाबंदी रस्ते बंद केल्याने महाराष्ट्रात प्रवेश बंद आहे असे मत पोउनि,अनिल कांबळे यांनी यावेळी म्हणाले भर उन्हात आपले कर्तव्य बजावताना पोहेका डि एस केद्रे,बि आर सोनकांबळे,पि एन मुधोळ, नागरगोजे आदि उपस्थित होते.