लातूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजीक अंतराने विनम्र अभिवादन

लातूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजीक अंतराने विनम्र अभिवादन



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर शहरासह महाराष्ट्राला कोरोना कोविड या विषाणू संसर्गजन्य रोगाने भयभित केल्याने कोरोनाच्या पाडावासाठी देशभरात ताळेबंदी केल्याने सार्वजनीक उपक्रम आणि समुह कार्यक्रमाला बंदी होती.  पंरतू जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कर्तव्य सावधगीरीतुन समजदारीमुळे डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठीच्या ध्वजरोहन व पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन करणेसाठी लातूरसह जिल्हाभरातील तालुका ठिकाणी परवानगी देण्यात आली. 
 लातूर येथील आंबेडकर पार्कवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भंन्ते पय्यानंद याचेसह लातूर मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे, भंन्ते पय्यानंद, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी नगरसेवक तथा दैनिक लातूर प्रभातचे संपादक रघुनाथ बनसोडे, पत्रकार अशोक हणवते, सुर्यभान लातूरकर, पंडित सुर्यवंशी यांनी बाबासाहेबांना पुष्पाजंली अर्पीत करुन अभिवादन केले.  या प्रसंगी भंन्ते पय्यानंद यांच्या हस्ते पंचशील ध्वजरोहन केल्यानंतर पंचशील, बुध्द वदंना घेण्यात आली.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या