कोरोनाग्रस्ताची सेवा करणार्यानांच घर व शेजारबंदीचे संकट
पुणे(दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोनाग्रस्त व कोराना बाधीत रुग्णाची सेवा व उपचार करणार्या वैद्यकीय अधिकारी व परिचारीकांनाच रुग्णलया शेजारील हॉटेल किंवा शेजारीच डॉक्टरचा शेजार नको म्हणून पुणे येथील रहिवाशी व हॉटेल चालक प्रशासनाकडे विनवणी करुन डॉक्टरांच्या सहवासाला विरोध करीत असल्यामूळे कोविड १९ बाधकच रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आमच्या शेजारी कसे राहवेत त्यासाठी त्यांना विरोध आहे. त्यांची व्यवस्था राहाण्याची दुसरीकडे करावी, अशी मागणी तेथील रहिवाशी करीत असल्यामूळे डॉक्टरच घर का ना घाटका, अशी अवस्था झाल्याने वैद्यकीय अधिकार्या समोर नविनच संकट उभे राहील्याचे चित्र दिसते आहे.
स्वतःचा जिव धोक्यात घालून कोरोना बाधीताची सेवा व उपचार डॉक्टर व नर्सेस करीत आहेत. त्यांच्या कुटूंबीयाना संसर्ग होवू नये व अधिची सेवा करता यावी यासाठी प्रशासनाने त्यांची व्यवस्था हॉटेल व इतर खोल्यामध्ये करण्याचे आदेश दिले. पंरतू शेजारील नागरीक व हॉटेल चालक डॉक्टरचा शेजार नको म्हणून पुढे येत असल्याने कांहीची शासकीय विश्राम गृहात सोय केली असून. इतर डॉक्टरांची सोय कोठे करावी हा प्रश्न शासनला भेडसावत असून स्थानीक तहसीलदार तृप्ती कोलते यांनी वैद्यकीय कर्मचार्याना समजून घेवून त्यांना सहकार्य करणे गरजेचे असून, समाजानी ही साथ दिली पाहिजे पंरतू समाज व शेजारील रहवाशी व हॉटेल चालक त्यांना सहकार्य करीत नसल्यामूळे तातडीने मार्ग काढून डॉक्टरांची सोय व वाढत्या कोरोनाग्रस्ताची उपचारात्मक उपाय योजना आखून वाढत्या संख्येवर पाबंदी आणू अशी ग्वाही तहसीलदार यांनी दिली. यातून कोरोनाग्रस्ताची सोय होते, आणि डॉक्टर रुग्णाच्या तंबूत आश्रय घेतात की काय अशीच चर्चा रुग्णालय परिसरात होताना दिसते आहे.