उद्याची पावले सावध असावीत

संपादकीय...


उद्याची पावले सावध असावीत


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ अभिवादन करुन कोरोना भितीच्या सावटात साजरी करण्यात आली.  ज्यानी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष आंबेडकरी चळवळीत समाजकारण, राजकारण केलेले आहे, त्यांना कांहीतरी चुकले, विसरले, हा दिवस कोणता व कसा आहे, याचे भानही हरवलेले असावे कारण त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच सुनीसुनी अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असावी.  कारण आहे ते एका अदृश्य कोरोना कोविड या जंतू रोगाने जगभरासह सार्‍या भारताला भेदरून टाकले आहे.  हा विषाणू रोग माणव निर्मित म्हणावा की, नैसर्गीक म्हणावा हे सांगणे कठीण असले तरी त्यावर वैज्ञानीक तज्ञ संशोधन करीत आहेत.  या प्रक्रियेत भारतीय वैज्ञानीक तज्ञासह जगातील वैज्ञानीक तज्ञ सहभागी असून या कोरोना रोगाची उत्पत्ती कोठे व कशी झाली यांचे संशोधन करीत आहेत.  ही बाब महत्वाची आहे असे वाटते.  
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातील शहरी ग्रामीण भागासह कानाकोपर्‍यातील तांडे वस्ती वाडीसह धुमधड्याक्यात रोशनाई, गाणे, विविध प्रकारचे स्पर्धात्मक खेळ स्पर्धा, व्याख्याने भव्यदिव्य मिरवणूका वेगवेगळ्या पोज मधील बाबासाहेबांचे तैलचित्रे, लेझीम, टिपरे, झांझ अशा वाद्याणी, नृत्यानी मिरवणूकीला जोशपुर्ण रंग येत असतो.  प्रत्येक घरात गोडधोड असतेच पण मिरवणूकीत तमाम स्त्रि-पुरुष वृध्द तरुणासह आंधळे, पांगळे ही सभागी असतात.  यातच अशा या उपेक्षितासाठी दिन-दलित अल्पसंख्या भटक्या विमुक्ता बरोबरच अख्ख्या माणव जातीच्या उध्दारासाठी, अस्पृश्यता निर्मूलणासाठी आणि या देशात धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी विचार रुजविण्यासाठी केलेले कार्य त्यातून झालेल्या परिवर्तणाची उत्क्रांती सामाजीक न्याय व हक्काची लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिकंली. त्या यशाचीच पावती असावी अशी चर्चा आजवर होत गेली.  पुढेही होतच राहाणार आहे.  पण कालच्या कोरोना रोगाच्या धास्तीत तमाम भारतीयांना केवळच दुरुनच नतमस्तक होवून अभिवादन करणे पलिकडे दुसरा कोणताही विकल्प नव्हता असेच म्हणावे लागेल.  
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजीक बदला बरोबरच राजकीय अस्तित्वाची लढाई सुरु ठेवली.  समाज परिवर्तनाच्या लढाई बरोबरच बाबासाहेबांनी बहिस्कृतहितकारणी सभा स्वतंत्र मजूर पक्षा तर्फे स्वतंत्रपुर्व काळात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रातांचे विधीमंडळ सदस्य होते.  त्यानंतर शेड्युल्डकास्ट फेडरेशन मधून बरेच यश मिळाले.  अनेकांनी विधीमंडळ लोकसभेत प्रतिनिधीत्व केले.  पंरतू बाबासाहेबांना कॉंग्रेसला समकक्ष असा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या क्षेत्राखाली सर्व जातीधर्माच्या सहभागाने राजकीय पक्ष स्थापन करायचा होता.  तशी ही सुरुवात केली होती.  अनेकाना पत्र लिहून तसा माणसही व्यक्त केला होता.  पंरतू बाबासाहेबाचे महापरिनिर्वाण झाले.  आणि पुन्हा एकदा मागास, दलित अस्पृश्य समाज काळोखात चाचपडू लागला.  तरी ही त्यावेळच्या बाबासाहेबांच्या अनुयानी खचून न जाता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला.  स्वार्थासाठी गटतट पडले त्यातील प्रत्येक नेत्यांनी आपापला गट स्थापन केला.  आणि कॉंग्रेसला रान मोकळे झाले. 
 दलितावरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढू लागले.  त्यावेळी दलित शिक्षीत तरुणांनी दलित पँथरची स्थापना केली. त्यात ही दोन गट पडले.  पुन्हा भारतीय दलित पँथर उदयास आली.  अपेक्षीतांना न्याय व रक्षणाचे कवच मिळाले. पँथरचा दबदबा वाढला. मागासवर्गीयांच्या समस्या अन्याय अत्याचाराचे निवारण होत गेले.  त्यात जातीयवादी शक्तीने शिवसेनेला बळ दिले.  शिवसेना विरुध्द पँथर असाच लढा सुरु झाला.  अनेक हितावह विषयासह मराठवाडा विद्यापीठ नांमातर आंदोलन छेडले गेले.  जातीयवादी शक्तीना हादरा बसला.  दलित मुक्ति सेनेेने सहभाग नोंदवीला आणि इथल्या राजकारणी मंडळीनी पँथरला डंख मारला, पँथर बरखास्त झाली.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुन्हा स्थापना झाली.  तीतही गटतट पडले.  आणि आजघडीला कोणी भाजपाकडे तर कोणी शिवसेनेकडे त्यात कोणी कॉंग्रेसकडे तर कोणी राष्ट्रवादीच्या तंबूत आपापले दुकान थाटून मांडून बसल्याने दीन दलित मागासाना कोणता झेंडा घेवू हाती आणि कोणा नेत्यांच्या मागे जावू अशी अवस्था झाल्याने गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष या आंबेडकरी चळवळीतील नेत्यासोबत राहून त्यांना मोठे करण्यात आयुष्य वेचले तेच आज आंबेडकरी नेत्यांचा बिनपैशाचा तमाशा पाहत, पोटाला चिमटे देत जगताना दिसतात.  पण हेच पुढे गेलेले नेते जुने पण खितपतपडलेल्या कार्यकर्त्याकडे पाहत नाहीत.  हे वास्तव नाकारता येत नाही.  
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालच्या जयंती निमित्ताने आजच्या दलित राजकारणाचा आंबेडकरी चळवळीचा अतर्ंमुखहोवून विचार केला तर ती फक्त नावानेच वळवळ करणारी कागदी नौकाच असावी असे चित्र दिसते आहे. गटातटातले सर्वच नेते हे स्थिरावलेल्या जातीयवादी पक्षाच्या कुबड्या घेवून दलितांच्या जिवावर राजकारण करीत आहेत.  नेते एकीकडे तर अनुभवि कार्यकर्ते घरात आणि नवखे तरुण कार्यकर्ते कोणाच्यातरी पाठीमागे धावताना दितसतात.  ही बाब कानाडोळा करण्याइतपत सोपी नाही.  किंवा असे हे चालतेच म्हणून गप्प बसता येणार ही नाही.  काळ सोखावलेला आहे, आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाना सत्तापदे हवी आहेत.  ती मिळत नसल्याने इकडूनतिकडे अशी धावपळ होवून वाताहत होते आहे.  तरी ही मीच मी म्हणून आपले नेते केवळ सत्तापदासाठी दुसर्‍याच्या दावणीत आहेत.  पण बाबासाहेबांची सावली त्यांच्या विचाराची धार, त्यांचा कणखर बाणा, त्यांच्या संघर्षातील धग, त्यांचेच संविधान आणि बाबासाहेबांचे अनुयायी एवढी मोठी ताकद असताना आजच्या आंबेडकरी नेत्यांने दुसर्‍याकडे पाहण्याची गरजच काय, वेळ गेलेली नाही, सावधगीरीने पावले उचलून देशभराती विखुरलेल्या चळवळी गटतट निळे झेंडे एकत्र आले तर निश्‍चितच यशच काय उद्याची सत्ता आपलीच असेल याचा सर्वानीच विचार करुन झाले गेले विसरुन एकत्रित पणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले नेते व प्राण समजून न्यायीक पायवाट धरली तर उद्याचा भारत आंबेडकर भारत झाल्याशिवाय राहाणार नाही.  अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या