आधुनिक भारताच्या
उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आधुनिक भारताच्या जडनघडणीत आणि उभारणीत मोलाचे योगदान असून ते अजरामर आहेच, परतू बाबासाहेबाचे उदारमतवादी धोरण माणवता वादी शिकवणूकीचे पालन करुन देशहीत व समाजाच्या भल्यासाठी आयुष्य वेचलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आजघडीला घरातच साजरी करुन विषारी कोरोना रोगाच्या निर्मूलनासाठीच्या लढाईत एकजुट दाखवूया असे अहवान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर दुर्बल वंचित मागास उपेक्षीतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची जगण्याची ताकद दिली. अशा या महामानवाच्या विचारातूनच आपणाला पुढे जाता येईल. असे स्पष्ट करुन अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुष्पांजलीतूनच अभिवादन केले. व संविधानानुसारच वाटचाल करु असे स्पष्ट करुन कोरोना हटविण्यासाठी जनतेने ताळेबंदी व सामाजीक अंतराचे पालन करुन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे अहवान ही, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले व पुन्हा एकदा बाबासाहेबाना विनम्र अभिवादन केले.