मुख्यमंत्री सहायता निधीला जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणेंकडून पन्नास हजाराची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीला जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणेंकडून पन्नास हजाराची मदत



लातूर :  नगर परीषद विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी सोमवारी आपल्या पत्नीच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे निमित्त साधून मुख्यमंत्री सहायता निधीला पन्नास हजार रूपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे त्यांनी हा धनादेश सुपूर्द केला.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन दुसर्‍यांदा वाढवण्यात आला आहे. अशा परीस्थितीत कोणीही सुजाण नागरीक वाढदिवस साजरा करण्याचा विचारही मनात आणू शकत नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांच्या पत्नी शर्मीला यांनी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला ५० हजारांची मदत देण्याची संकल्पना मांडली. सतीश शिवणे यांनीही त्याला दुजोरा देत सोमवारी ती लगेचच अंमलात आणली आणि फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून पन्नास हजारांचा धनादेश जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शर्मिला शिवणे यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मुख्यमंत्री सहायता निधीत भर टाकल्याबद्दल आभारही  मानले.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या