राज्याचा गृह आणि वित्त विभाग अतिरिक्तांच्या हाती

राज्याचा गृह आणि वित्त विभाग अतिरिक्तांच्या हाती


मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः राज्य सरकार मधील महत्वाची खाते म्हणजे गृह खाते व वित्त विभाग हीच असतात.  ऐनवेळी उद्भवलेल्या आर्थिक समस्या असतील त्या वेळी वित्त विभागाला सतर्क राहून तोंड द्यावे लागते.  तर राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम गृह खात्याकडे असते.  आजघडीला भयावह असा कोरोना कोविड या विषारी संसर्गजन्य रोगाने महाराष्ट्राला नाकीनऊ आणून सोडले आहे.  अशा या परिस्थितीत राज्याच्या गृह खात्यासह वित्त विभागाचा कारभार हा अतिरिक्त सचिवाच्या हाती सोपविल्याने अर्थ वित्त अशा अतिमहत्वाच्या खात्याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दुर्लक्ष कसे काय अशी चर्चा होताना दिसते आहे.  ही बाब चिंत्ताजनक वाटते. 
 मागील सरकारने ही या विभागातील सचिवांच्या दर सहा सहा महिण्याने अदलाबदल केली होती.  कालचे आज नको म्हणून हे की ते म्हणत गृह व वित्त विभागाला पुर्णवेळ सचिव नियुक्त करणे ऐवजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौणीक यांच्याकडे वित्त विभागाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे.  तर गृह निर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार यांच्यावर गृह विभागाची अतिरिक्त सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली असल्याने मुंबईसह राज्यभरात ताळेबंदीमुळे नागरीकात भितीसह नाराजी व कोरोनाचा शिरकाव यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस यंत्रणेवर ताण तर उद्योग व्यवसाय बंदी मुळे आर्थिक समस्यासह बेरोजगाराची वनवन यामुळे आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागते आहे.  यासाठी अर्थविभाग व गृह विभाग हा तत्पर निर्भय असणे गरजेचे असताना कोरोना विरुध्द लढाईच्याकाळात या विभागाकडे मुख्यमंत्री व प्रशासनाचे दुर्लक्ष कसे हा प्रश्‍न मंत्रालय परिसरासह जाणकारात चर्चीला जातो आहे.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या