कोरोनाने मुंबईचे कंबरडे मोडले तरी कोरोना विरुध्द युध्द चालूच

कोरोनाने मुंबईचे कंबरडे मोडले तरी कोरोना विरुध्द युध्द चालूच


मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः स्वतंत्र राज्य निर्मितीसाठीची योग्य असलेले शहर म्हणून मुंबईचे नांव पुढे येते.  अशा या मुंबई शहराला कोरोना कोविड या संसर्गजन्य रोगाने पछाडलेले आहे.  कोरोना ग्रस्त रुग्णाची रोजची वाढ डोकेदुखी बनली असली तरी युध्द पातळीवरील वैद्यकीय उपचारामुळे अनेक जन घरी जात आहेत.  तर अनेकावर उपचार सुरु असून मृतांची संख्याही धास्तावणारी नसली तरी वैद्यकीय तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी कोरोना बाधीत रुग्णावर जिवापाड उपचार करताना दिसत आहेत.  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री सतर्कतेने मुंबईसह राज्यभरातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करुन वेळोवेळी सुचनासह कोरोना निर्मूलनासाठी लागणारी यंत्रसामुग्री औषधीचा पुरठवा करणे संदर्भात विनाविलंब सेवा पुरवीत असून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी हे प्रत्यक्ष रुग्णासह आरोग्य विभागावर आणी डॉक्टर व त्यांच्या ताफ्यातील कर्मचारी यांचेशी संवाद साधून असल्याने कोरोना विरोधी लढाई तिव्र होताना दिसते आहे. 
 सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण मुंबईत आहेत.  तरी ही बाधीताच्या तुलणेत मृतांचे गुनोत्तर प्रमाण कमी असून त्यासाठी कोरोना लढ्यातील सिलेदार मनपा आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांचे मार्गदर्शन आणि कोरोना बाबतीत संशयीत रुग्णाचे अलगीकरण विलगीकरण किंवा रुग्णाना इतरत्र हालवून त्यावर उपचारा संदर्भात सल्ला व तात्काळ कारवाई यामुळेच कोरोना फैलाव मंदावल्याचे दिसते आहे.  कोरोनाच्या संसर्गामुळे व बाधीताच्या संख्येमूळे देशभरात संचार बंदी लॉकडाउन जारी केल्याने मुंबईचे आर्थिक दृष्टया कंबरडे मोडले असले तरी जिव घेण्या कोरोना विरुध्दची लढाईतील यौध्दे हे डॉक्टर व नर्स त्यांचा स्टॉफ सह मुख्यमंत्री आरोग्य मंत्री मनपा आयुक्त आणि त्यांचे सहकारी स्थानीक प्रशासन व पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभत असल्याने मुंबई गजबजलेली नसली तरी कोरोनाशी दोनहात करण्यात गुंतले असल्याचीच दिसते आहे.  त्यामूळे जिवघेण्या कोरोना रोगामुळे मुंबईचे कंबरडे मोडले असले तरी कोविड विरुध्दात युध्द चालू असणारच अशी चर्चा होत असून वेळीच कोरोना मुक्त भारत होण्यासाठी मुंबईचा हातभार लागेल अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या