अंत्यसंस्काराची नव्हे कोरोनामुक्त लातूरची जबाबदारी घ्या
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः राज्याला कोरोना कोविड या विषारी रोगाने भयभित करुन सोडले आहे. लातूरला ही कोरोनाग्रस्त लातूर म्हणून डाग लागलेला आहे. यासाठी लातूर महानगरपालिकेने लातूरची स्वच्छता व आरोग्यकडे लक्ष द्यावे, शहरी गटारी साफ करणे, रस्ते व शहरातील मोकळ्या जागेसह गल्लो गल्ली औषधी फवारणी करणे गरजेचे आहे. केवळ बातम्या सोडून शहराची स्वच्छता व रोग्य मुक्ती होत नाही, त्यासाठी प्रत्यक्षात कृती करावी लागते. म्हणून लातूर मनपाने तशी तात्काळ कारवाई करुन कोरोना मुक्त लातूर करावे अशी मागणी आमजनतेतून होताना दिसते आहे.
शहरात औषधी फवारणी चालू आहे. मनपा कार्यालयात वॉर रुम कार्यरत आहे हे वृत्तपत्रातून वाचण्यासाठी करमनूकीचे साधन ठरते, पंरतू बेवारस मृतांची विल्हेवाट लावणे हे पुर्वीपासूनच त्या त्या नगर परिषद किंवा महानगरपालिकेचे ते आध्य कर्तव्यच असते आणि आहेच. मग कोरोना पाडावासाठीच्या काळात नव्याने ही योजना कार्यान्वीत केली गेली असल्याचा दावा लातूर मनपा प्रशासनाने करु नये, अंत्यसंस्कारासाठी नव्हे तर कोरोना मुक्त लातूरसाठी नव्याने कांही तरी उपाय योजना करण्याची मनपा प्रशासनी जबाबदारी घ्यावी व ती अमलात आणावी अशी ही मागणी होताना दिसते आहे.