कोरोनाग्रस्ताची वाढती संख्या लक्षात घेवून संसर्गजन्य विभाग सील
पुणे (दै.लातूर प्रभात प्र.) ः मुंबई नंतर पुणे शहर व परिसरात कोरोनाग्रस्त व बाधीतांची संख्या वाढत असल्याने पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सुचनेनुसार कोविड १९ चा प्रार्दुभाव असलेल्या भागात सिल करण्याचे आदेश जारी केले गेले. त्यानुसार पोलीस सहआयुक्त रविद्रं शिसवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पुणे शहरातील २८ विभाग सिल केले असून त्या ठिकाणी दररोज सकाळी १० ते १२ पर्यत जिवनाश्यक वस्तू खरेदी करता येईल त्याचे निर्बध लॉकआउट उठे पर्यत राहतील, असे पुणे मनपा आयुक्त यांनी स्पष्ट केले.
पुणे शहर व परिसरात कोरोना संकर्मीत रुग्णाची संख्या वाढत असल्याने पुणे महानगरपालिका, पिपंरीचिचवड महापालीका जिल्हा परिषद, आणि आरोग्य विभागासह जिल्हा शहर प्रशासनही कोरोना विरुध्द लढाईत सक्रीय झाले असून बाधीत रुग्णा पैकी अनेकाना उपचारांती सुट्टी देण्यात आली असून युध्द पातळीवर कोरोना बाधीतीवर उपचार चालू असल्याने नागरीकांनी लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करणे हाच एक पर्यायी उपाय असल्याचे आरोग्य विभागासह प्रशासन, पोलीस यंत्रणेतही तशी चर्चा होताना दिसते आहे.