कोरोना बाधीत रुग्णा बरोबरच गुजरातमध्ये धर्मवादाचे पेव
अहमदाबाद (दै.लातूर प्रभात प्र.) ः स्वातंत्र्य लढ्यातील म.गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा व राजकीय सावली लाभलेला गुजरात प्रदेश हा आजच्या प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जन्मभुमी व कर्मभुमी होय, अशा या मोदी-शहा यांच्या गुजरात मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या उपचारातून कोवीड हटाव मोहिमेबरोबरच धर्मवादाची भक्कम पायाभरणी शासकीय यंत्रणेकडून करवून घेतली जात आहे. या घातकी कृतीवृत्ती मुळे मोदी-शहा यांना काय अपेक्षीत असावे अशी ही उलटसूलट चर्चा गुजरात मध्ये होताना दिसते आहे. देशभरात कोरोना कोविड च्या संसर्गजन्य रोगाने हाहाकार माजवीला आहे. अशा रोगाचे युध्दपातळीवर निर्मूलन करुन कोरोनामूक्त भारत करणेसाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचीच धडपड असली तरी त्यांच्या आदेशानेच संचार बदंी, लॉकडाउनचे तमाम पालन करीत असताना बंदीवासात जिवन जगत आहेत. तर कोरोना बाधीत रुग्ण शासकीय दवाखाण्यात उपचार घेत घेत उद्याच्या जगण्याची वाट पाहत असताना दिसत असले तरी अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालयात नव्यानेच विस्तारीकरण करुन उभारलेल्या स्वतंत्र विंग मध्ये कोरोना बाधीत रुग्णावर उपचार करणेसाठी ए-४ आणि सि-४ असे वार्ड करण्यात आले असून त्यात वेगवेगळ्या धर्मीयासाठी ए व सी मध्ये वेगवेगळे ठेवण्यात आले असल्याने धर्मवाद पुढे करुन असे का केले असे विचारता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गुणवंत राठोड यांनी सरकारच्या आदेशामुळेच तसे करणे भाग पडले अशी कबूली प्रसार माध्यमासमोर राठोड यांनी दिल्याचे दिसून येते.
शासकीय दवाखण्यात असे वेगवेगळे वार्ड कसे काय असे विचारले असता उपमुख्यमंत्री पटेल व अहमदाबादचे जिल्हाधिकारी के.के. निराला यांनी या विषयी आम्हाला कांहीच माहित नसल्याचे सांगीतले. तर निराला म्हणाले की, तसे वर्गीकरण करण्यास आम्ही सांगीतले नाही. व सरकारकडून तसे सांगण्यात आल्याचे मला तर माहित नाही, असे स्पष्ट केल्याने जातीय तेढ निर्माण करणे, धर्माचे पेव फोडून धर्मवादातून संघर्ष निर्माण करणे हाच हेतू असावा अशी चिंत्ताजनक संतापात्मक लाट उसळल्याचे चित्र दिसते आहे. लोकशाही प्रधान धर्मनिरपेक्ष भारताचे पंतप्रधान, केंद्रिय गृहमंत्री यांच्याच जन्मभुमि कर्मभुमीत असे जात धर्मवादाचे पेव फुटत असेल तर अशा लोकप्रतिनिधीकडून दुसरी तिसरी कोणीती अपेक्षा व्यक्त करावी हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो अशी सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.