कोविड विषाणूची घुसखोरी मंदावली

कोविड विषाणूची घुसखोरी मंदावली


दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड या विषारी विषाणुचा निपटारा करणेसाठी देशपातळीवर आरोग्य विभाग युध्द सदृश्य लढा देत असून कोरोना प्रतिबंध उपचाराने कोविड विषाणुचा वेग मंदावला असल्याने एकुण रुग्णापैकी चाळीस टक्के रुग्णाची घट झाली असून दररोज कोरोनाग्रस्तावर उपचारांती रुग्ण घर जवळ करीत आहेत.  तर कांही बरे होताना दिसत आहेत.  त्यातच भारतीय आरोग्य संशोधन केंद्राने कोवीड या विषारी रोगावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करणे बाबत, संशोधन वेगाने करीत असून एक दोन आठवड्यातील ती लस आरोग्य विभागात वापरली जाईल त्यासाठी कोरोनग्रस्त किंवा जनतेने घाबरुन न जाता लॉकडाउनचे पालन करुन आरोग्य विभाग प्रशासन, पेालीस यंत्रणेला सहकार्य करावे असे अहवान केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी केले आहे.  लॉकडाउनमुळे कोविडचा फैलाव होवू शकत नाही म्हणून आरोग्य विभागाला रुग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टरावरील ताण कमी झाला असला तरी वैद्यकीय क्षेत्र युध्द पातळीवर कोरोना हद्दपार करणे बाबत अटोकाट प्रयत्न करीत असून त्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभाग कार्यरत असल्याची अग्रवाल यांनी संागीतले.  
 कोरोना कोविडचा प्रार्दूभाव असलेल्या रुग्णावर वैद्यकीय तज्ञ व संशोधन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर व त्यांचे पथक रुग्णावर उपचार करीत असून बाधीत रुग्ण बरे होत आहेत.  पंरतू निर्णायक लस व औषधी उपचारासह आरोग्य विभागातील इतर यंत्र सामुग्री बाजारात आल्याशिवाय कोरोना कोविड या समुळ उच्चाटन होणार नसल्याने केवळ लॉकडाउन हाच पर्याय असल्याचे भारतीय आरोग्य वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमूख डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या